लातूर जिल्हा

DYSP जितेंद्र जगदाळे आणि त्यांच्या टिमने चोरी करण्याच्या तयारीत असलेल्या पाच जणांना केली अटक

महाराष्ट्र खाकी ( लातूर ) – लातूर शहर DYSP म्हणून जितेंद्र जगदाळे यांनी सूत्र हाती घेतले आहे तेव्हा पासून शहरातील गुन्ह्याचे प्रमाण कमी तर झालेच आहे. पण गुप्तहेर यांच्या सहाय्याने गुन्हे होण्याच्या आधीच गुन्हेगारांना पोलिसी हिसका दाखवला जातो त्यामुळे होणारे गुन्हे ही कमी झाले आहेत. असेच एक गुन्ह्याची उकल जितेंद्र जगदाळे आणि त्यांच्या टिमने केली आणि गुन्हेगारांना जेरबंद केले आहे.दिनांक 25/05/2021 रोजी DYSP लातूर शहर जितेंद्र जगदाळे हे नाईट पेट्रोलिंग नियोजन व मार्गदर्शन करीत ऑफिसमध्ये असताना त्यांना गुप्त बातमीदारा द्वारे बातमी मिळाल्या वरुन DYSP लातूर शहर जितेंद्र जगदाळे व त्यांचे विशेष पथकातील सफो/बहिद शेख, पोह/642 रा. ब. डगे, पोना/130 पारडे, तसेच गांधी चौक पोलीस स्टेशनचे पोलीस उप निरीक्षक /कव्हाळे, पोना/ 170 शिंदे, पोना/1727 बेसके यांना सोबत घेवून सिध्देश्वर मंदिरचे उत्तर कंम्पाऊंड लगत दरोडा टाकण्याची तयारी करत अंधारात बसलेले होते. पोलिसांची चाहूल लागताच दोघेजण कंपाऊंड वरुन उडयामारुन पळू लागले, त्यांचा पाठलाग केला असता ते अंधाराचा फायदा घेत तेथून पळून गेले. पोलिसांनी तिघांना जागीच पकडून त्यांचे नावगाव विचारले असता त्यांनी त्यांचे नाव 1) अजिंक्य निळकंठ मुळे वय 24 वर्ष रा. उत्का ता. औसा हमु जुना ओसा रोड, लातूर, 2) विश्वजीत अभिमन्यू देवकते वय 20 वर्षे, रा. कातपुर ता.जि. लातूर 3) गणेश महादेव माने वय 19 वर्षे, रा. खोरी गल्ली, लातूर त्यांची झडती घेतली असता त्यापैकी अजिक्य मुळे यांचेकडे एक तलवार विश्वजीत देवकते याचेकडे एक लोखंडी रॉड व गणेश माने याच्या खिशात मिरची पावडर मिळून आले. त्यांना पळून गेलेल्या इसमाचे नाव विचारता त्यांची नावे 1) सुनिल विठठल भोसले रा राजे शिवाजी नगर, वसवाडी लातूर 2) निलेश काळे रा. शिरुर अनंतपाळ हमु खर्डेकर स्टॉप, लातूर असे सांगितले. त्यावरुन DYSP लातूर शहर जितेंद्र जगदाळे यांच्या फिर्याद वरुन पोलीस स्टेशन गांधी चौक, लातूर FIR NO.299/2021 कलम 399, 402, 188, 269 270 भा.द.वि व कलम 4, 25 भारतीय हत्यार कायदा प्रमाणे तसेच कोव्हिड 19 प्रतिबंधक अधिनियम 2,3,4 प्रमाणे वरील 5 आरोपी विरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच वरील पाच ही गुन्हेगार सराईत असून त्यांनी लातूर शहरात व इतर ठिकाणी वस्तू विषयी व शरीराविषयी बरेच गुन्हे केलेले आहेत.

दि. 26/05/2021 रोजी DYSP लातूर शहर जितेंद्रजगदाळे यांच्या आदेशावरुन विशेष पथकातील सफो/ वहिद शेख, पोह/ 641 रामचंद्र ढगे, पोना/ १३० महेश पारडे, व पोलीस स्टेशन गांधी चौक, लातूर येथील पोना / 170 दत्ता शिंदे, पोना/ 1727 बेस्के, असे मिळून पो.स्टे गांधी चौक, लातूर FIR NO.299/2021 मधील दरोडयातील फरार आरोपी सुनिल भोसले व निलेश काळे यांचा शोध घेत राजेशिवाजी नगर, लातूर येथे गेले असता तेथे सुनिल विठठल भोसले हा मोटार सायकलसह मिळून आला त्यास पकडून मोटार सायकलची विचारपुस केली असता त्याने दोन दिवसापूर्वी मी व इतर चार साथीदार सिध्देश्वर मंदिर येथे चोरी करण्यासाठी बसलो होतो. पोलीसांना पाहून तेथून मी व निलेश काळे पळून गेलो व त्याच रात्री मजगे नगर, लातूर येथे जावून एका घरा समोरुन मी वापरत असलेली मोटार सायकल चोरुन आणलेली असल्याचे सांगितले. त्याची खात्री केली असता पोलीस स्टेशन गांधी चोक, लातूर येथील FIR NO.302/2021 कलम 379 भा.द.वी मधील चोरीची असल्याचे निष्पत्नर झाल्याने सदर मोटार सायकल जप्त करून त्याचेकडे अधिक विचारपुस केली असता त्याने लातूर शहरातील टयूशन भागात, दयानंद कॉलेज गेट, प्रकाश नगर, लातूर येथे दुकानचे शटरचे कुलूप तोडून आत प्रवेश करुन आतील रोख रक्‍कम व मोबाईल चोरी केल्याचे व इतर बरेच मोबाईल चोरी केल्याचे सांगितले आहे. सदर मोबाईल बाबत अधिक तपास चालू आहे. सदर आरोपी पोलीस स्टेशन गांधी चौक, लातूर येथे मोटार सायकलसह हजर केले आहे.

वरील कार्यवाही मा. निखील पिंगळे पोलीस अधिक्षक, लातूर, मा. हिंमत जाधव अपर पोलीस अधिक्षक, लातूर, यांचे मार्गदर्शना खाली DYSP लातूर शहर जितेंद्र जगदाळे यांनी व त्यांचे विशेष पथकातील पोलीस अंमलदार सफो/ वहिद शेख, पोह/641 आर बी ढगे, पोना/ 130 पारडे, तसेच गांधी चौक, पोलीस स्टेशनचे पोउपनि/कव्हाळे, पोना / 170 शिंदे, पोना / 1727 बेसके यांनी विशेष कामगीरी केली

Most Popular

To Top