महाराष्ट्र खाकी (पिंपरी -चिंचवड / विवेक जगताप ) – भारतीय जनता पार्टी पिंपरी-चिंचवड शहर मुख्य प्रवक्ते पदी मा. नगरसेवक राजाभाऊ दुर्गे यांची निवड भारतीय जनता पार्टी पिंपरी-चिंचवड शहराच्या संघटन बळकटीकरणाला अधिक गती देण्यासाठी आणि पक्षाची भूमिका जनतेसमोर ठामपणे मांडण्यासाठी मा. नगरसेवक राजाभाऊ दुर्गे यांची भारतीय जनता पार्टी पिंपरी-चिंचवड शहर मुख्य प्रवक्ते पदी निवड करण्यात आली आहे. भारतीय जनता पार्टी पिंपरी-चिंचवड शहराध्यक्ष तथा नगरसेवक शत्रुघ्न (बापू) काटे यांच्या प्रमुख उपस्थितीत राजाभाऊ दुर्गे यांना नियुक्तीपत्र सोपवून या महत्त्वपूर्ण आणि जबाबदारीच्या पदावर त्यांची औपचारिक वर्णी लागली आहे.
पक्षाचा विचार आणि महापालिकेचा विकास जनतेपर्यंत पोहोचवा: शत्रुघ्न (बापू) काटे
या प्रसंगी राजाभाऊ दुर्गे यांचे अभिनंदन करताना भाजप शहराध्यक्ष शत्रुघ्न (बापू) काटे म्हणाले, “राजाभाऊ दुर्गे हे अभ्यासू, वक्ते आणि तळागाळातील लोकांची स्पंदने जाणून पक्षाची तत्त्वे पोहोचवणारे धडाडीचे कार्यकर्ते आहेत.”*
केंद्र व राज्य सरकारच्या धोरणात्मक निर्णयांची प्रभावी मांडणी करून, महापालिकेच्या माध्यमातून शहरातील विविध विकासकामांचा आलेख लोकांसमोर आणणे आणि विरोधकांच्या खोट्या प्रचाराला चोख प्रत्युत्तर देणे यात त्यांची भूमिका अत्यंत महत्त्वाची ठरेल. त्यांच्या या नियुक्तीमुळे पक्षाच्या संघटनशक्तीला आणखी मोठी ताकद मिळेल, असा ठाम विश्वास त्यांनी व्यक्त केला.
ठामपणे पक्षाची ध्येय-धोरणे मांडणार: राजाभाऊ दुर्गे
आपल्या नियुक्तीबद्दल प्रतिक्रिया देताना नवनिर्वाचित मुख्य प्रवक्ते राजाभाऊ दुर्गे म्हणाले, “पक्षाने माझ्यावर टाकलेला हा विश्वास म्हणजे माझ्यासाठी मोठा सन्मान आहे. भारतीय जनता पक्षाची ध्येय-धोरणे, विचारसरणी आणि शहरात झालेली विविध विकासकामे प्रसारमाध्यमे व सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रभावीपणे जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी मी पूर्ण ताकदीने कार्यरत राहीन.”* राजाभाऊ दुर्गे यांच्या या महत्त्वपूर्ण नियुक्तीबद्दल पिंपरी-चिंचवड शहरातील पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि हितचिंतकांकडून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.




