Home » राजकीय » Yash sane चिमुकलीवर भटक्या कुत्र्यांच्या क्रूर हल्ल्यानंतर नगरसेवक यश दत्ताकाका साने आक्रमक; नागरिकांच्या सुरक्षेेशी तडजोड सहन करणार नाही

Yash sane चिमुकलीवर भटक्या कुत्र्यांच्या क्रूर हल्ल्यानंतर नगरसेवक यश दत्ताकाका साने आक्रमक; नागरिकांच्या सुरक्षेेशी तडजोड सहन करणार नाही

महाराष्ट्र खाकी (पिंपरी – चिंचवड / विवेक जगताप) – चिंचेचा मळा परिसरात चिमुकलीवर प्राणघातक हल्ला चिंचेचा मळा  परिसरात काही दिवसांपूर्वी एका निष्पाप चिमुकलीवर भटक्या कुत्र्यांनी अत्यंत क्रूरपणे हल्ला केला, ज्यामध्ये ती गंभीररित्या जखमी झाली. ही हृदयद्रावक आणि संतापजनक घटना घडल्यामुळे संपूर्ण परिसरात दहशतीचे वातावरण पसरले असून, नागरिकांच्या सुरक्षेचा गंभीर प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

नगरसेवक यश दत्ताकाका साने आक्रमक
या संपूर्ण प्रकरणावर तीव्र संताप व्यक्त करत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या  वतीने प्रशासनाचा निषेध करण्यात आला. यावेळी नगरसेवक यश साने  यांनी प्रशासनाला धारेवर धरत खालील मुद्द्यांवर ठाम भूमिका मांडली,प्रशासनाने प्रभागातील सर्व भटके व हिंसक कुत्रे यांचा तातडीने बंदोबस्त करावा आणि नागरिकांना तात्काळ सुरक्षित वातावरण उपलब्ध करून द्यावे. नागरिकांच्या जीविताशी आणि सुरक्षेेशी कोणतीही तडजोड केली जाणार नाही. माझ्या प्रभागातील प्रत्येक नागरिकाची सुरक्षितता ही माझी प्राथमिक जबाबदारी आहे.

जर प्रशासनाकडून लवकरात लवकर ठोस कारवाई केली गेली नाही, तर सर्व हिंसक कुत्र्यांना पकडून थेट संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांच्या केबिनमध्ये सोडण्यात येईल , असा सज्जड आणि तीव्र इशारा नगरसेवक यश साने यांनी प्रशासनाला दिला आहे. “नागरिकांच्या जीवाशी खेळ आता सहन केला जाणार नाही. प्रशासनाने तात्काळ पावले उचलली नाहीत, तर तीव्र आंदोलनाला सामोरे जावे लागेल.” — यश दत्ताकाका साने, नगरसेवक (राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष)

Share This News

Related Post

National