Home » महाराष्ट्र » Pimpri – chincvad आरक्षण उपवर्गीकरण सामाजिक सलोखा समितीची स्थापना: मातंग-महार ऐक्यासाठी लोकसेवक युवराज दाखले यांचे महत्त्वपूर्ण पाऊल

Pimpri – chincvad आरक्षण उपवर्गीकरण सामाजिक सलोखा समितीची स्थापना: मातंग-महार ऐक्यासाठी लोकसेवक युवराज दाखले यांचे महत्त्वपूर्ण पाऊल

महाराष्ट्र खाकी ( पिंपरी / विवेक जगताप ) – देशाचा ७९ वा स्वातंत्र्यदिन एका बाजूला उत्साहात साजरा होत असतानाच, दुसरीकडे सामाजिक सलोखा आणि सलोख्याचे एक आदर्श उदाहरण पिंपरीतून समोर आले आहे. शिवशाही शासन पक्षाचे संस्थापक प्रमुख लोकसेवक युवराज दाखले यांनी देशहिताचा संकल्प करत ‘आरक्षण उपवर्गीकरण सामाजिक सलोखा समिती’  स्थापन करण्याची घोषणा केली आहे.
आरक्षण उपवर्गीकरणाच्या मुद्द्यावरून मातंग आणि महार समाजात कोणतेही गैरसमज किंवा तणाव निर्माण होऊ नयेत, यासाठी हा अत्यंत स्तुत्य आणि दूरगामी निर्णय घेण्यात आला आहे. दोन्ही समाजांमधील ऐतिहासिक सलोखा कायम राहावा आणि विकासाच्या मुद्द्यांवर एकोपा टिकून राहावा, हा यामागील मुख्य उद्देश आहे.

समितीचे प्रमुख उद्दिष्ट
या समितीच्या माध्यमातून समाज बांधवांसमोर खालील महत्त्वपूर्ण मुद्दे मांडण्यात आले आहेत:
1) वाद धोरणावर, समाजात नाही –  उपवर्गीकरणाबाबत मतभेद असले तरी ते दोन समाजांतील संघर्षाचे कारण बनू नयेत.
2)संविधानावर निष्ठा –  सर्वोच्च न्यायालय तसेच केंद्र व राज्य सरकारच्या निर्णयांचा अभ्यास करून घटनात्मक मार्गाने भूमिका मांडावी.
3)वंचितांचा विकास –  ‘कोणाला काय मिळाले?’ यापेक्षा ‘वंचितांना काय मिळाले?’ हा खरा दृष्टिकोन असावा.
4)ऐतिहासिक संबंधांचा आदर –  महाराष्ट्राच्या सामाजिक परिवर्तनाच्या चळवळीत मातंग आणि महार समाजाने दिलेल्या योगदानाचा विसर पडू देऊ नये.
5)सोशल मीडियाचा संयमी वापर – तरुणांनी अफवा किंवा अपूर्ण माहिती पुढे न पाठवता अधिकृत माहिती तपासावी.
6)संयुक्त विकासाचा अजेंडा – शिक्षण, रोजगार, कौशल्यविकास, शिष्यवृत्ती आणि स्पर्धा परीक्षा या समान प्रश्नांवर दोन्ही समाजांनी एकत्र काम करावे.
7)आरक्षण विरुद्ध आरक्षण मानसिकता टाळावी –  उपलब्ध संधी वाढविण्यासाठी शासनाकडे संयुक्तपणे मागण्या करणे अधिक सकारात्मक ठरेल.

मुख्य संदेश
“उपवर्गीकरणाच्या मुद्द्यावर मतभेद असतील, पण मनभेद होऊ नयेत. आरक्षणाच्या प्रश्नावर घटनात्मक मार्गाने संघर्ष करूया; मात्र मातंग-महार ऐक्य, परस्पर सन्मान आणि सामाजिक सलोखा कायम ठेवूया.”
लोकसेवक युवराज दाखले

एकतेच्या प्रवासात सहभागी होण्याचे युवराज दाखले यांचे आवाहन
स्थानिक पातळीवर दोन्ही समाजातील ज्येष्ठ, युवक, महिला, सामाजिक कार्यकर्ते आणि कायदेतज्ज्ञ यांचा सहभाग घेऊन ‘संयुक्त सामाजिक संवाद समित्या’ स्थापन करण्यात येणार आहेत.
बहुजन समाज बांधवांनी मोठ्या संख्येने पुढे येऊन या आरक्षण उपवर्गीकरण सामाजिक सलोखा समन्वयक समितीमध्ये सक्रियरित्या सहभाग घ्यावा, असे आवाहन लोकसेवक युवराज दाखले यांनी केले आहे.
संपर्क क्रमांक  9922373959 युवराज दाखले

Share This News

Related Post

National