MLA Rohit Pawar मुख्यमंत्र्यांचा दौरा म्हणजे केवळ ‘शो-ऑफ’ दुष्काळ निवारणाच्या तोकड्या उपाययोजनांवरून रोहित पवारांचा सरकारवर जोरदार हल्लाबोल
महाराष्ट्र खाकी ( विवेक जगताप ) – राज्यभरात भीषण कोरड्या दुष्काळाची परिस्थिती असताना, सरकारने जाहीर केलेल्या उपाययोजना पूर्णपणे ‘कोरड्या आणि तोकड्या’ असल्याची टीका करत आमदार रोहित पवार यांनी राज्य सरकारला धारेवर धरले आहे. १९७२ च्या दुष्काळाहूनही गंभीर परिस्थिती असल्याचे खुद्द मुख्यमंत्री मान्य करत असताना, प्रत्यक्षात मात्र अत्यंत मोघम उपाययोजना केल्या जात असल्याचा गंभीर आरोप त्यांनी…

