महाराष्ट्र खाकी ( छत्रपती संभाजीनगर / विवेक जगताप ) – लातूरचे माजी खासदार, प्राध्यापक व विधिज्ञ मा. डॉ. सुनील गायकवाड यांचा भारत समाज भूषण पुरस्कार २०२६ ने भव्य गौरव करण्यात आला. सिंधुदुर्ग येथील संस्थेने व किल्ले पर्यटन महोत्सव फाउंडेशन, महाराष्ट्र यांच्या संयुक्त विद्यमाने छत्रपती संभाजीनगर येथे आयोजित भव्य स्टार ग्लोबल पुरस्कार वितरण सोहळ्यात हा सन्मान प्रदान करण्यात आला.
सोहळ्याचे वैशिष्ट्य
1) पुरस्कार वितरण संस्थेचे अध्यक्ष डॉ. बी. एन. खरात यांच्या हस्ते झाले.
2) प्रमुख उपस्थिती: प्रसिद्ध अभिनेते दिलीप घेवंदे, अभिनेत्री लिना पंडित, अभिनेते रमेश अग्रवाल, डॉ. मंगल पांचाळ, कृष्ण कुमार दडके आदी मान्यवर.
डॉ. गायकवाड यांना स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.
मा. खासदार डॉ. सुनील गायकवाड यांचे योगदान
लातूर लोकसभा मतदारसंघाचे खासदार म्हणून त्यांनी अनेक जनहिताचे व ऐतिहासिक निर्णय घेतले. यामध्ये प्रमुख आहेत
1) माहिती तंत्रज्ञान स्थायी समितीत मोबाईल क्रमांकातील ‘शून्य’ हटविण्याची सूचना करून देशव्यापी बदल घडवून आणला.
3) लातूरसाठी सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, पासपोर्ट सेवा केंद्र, NEET परीक्षा केंद्र, रेल्वे स्टेशनचे आधुनिकीकरण, नवीन रेल्वे गाड्या, राष्ट्रीय महामार्ग, जलयुक्त शिवार अभियान, घरकुल योजना, जनधन योजना, मुद्रा योजना यांसारख्या अनेक विकास प्रकल्पांची प्रभावी अंमलबजावणी.
4) खासदार निधीचा पारदर्शक व सर्वसमावेशक वापर करून संपूर्ण मतदारसंघात विकास साधला.
5) हिंदी भाषेच्या प्रसारासाठी देशभर कार्य केले.
6) भारत सरकारतर्फे दोन वेळा परदेशात प्रतिनिधित्व करून देशाची प्रतिष्ठा वाढवली.
त्यांच्या पाच वर्षांच्या कार्यकाळातील या सर्वसमावेशक योगदानाची दखल घेत हा प्रतिष्ठित पुरस्कार देण्यात आला.
या गौरवामुळे लातूर जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्रात आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून, विविध स्तरातून डॉ. गायकवाड यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.








