“माझं गाव, आरोग्यसंपन्न गाव” अभियानाचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते शुभारंभ

महाराष्ट्र खाकी (मुंबई / विवेक जगताप)  – जागतिक आरोग्य दिनाच्या निमित्ताने ग्रामीण महाराष्ट्रातील आरोग्य व्यवस्थेला बळकटी देण्यासाठी राज्य शासनाच्या “माझं गाव, आरोग्यसंपन्न गाव” या महत्त्वाकांक्षी अभियानाचा शुभारंभ Devendra Fadnavis यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी उपमुख्यमंत्री Eknath Shinde, उपमुख्यमंत्री Sunetra Ajit Pawar तसेच सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री Prakash Abitkar यांच्यासह मंत्रिमंडळातील सर्व मंत्री उपस्थित होते.

या कार्यक्रमात अभियानाची माहिती देणारा व्हिडिओ व पुस्तिकेचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. ग्रामीण भागातील नागरिकांना दर्जेदार आरोग्य सुविधा त्यांच्या उंबरठ्यावर उपलब्ध करून देणे आणि आरोग्य व्यवस्था सक्षम करणे हा या मोहिमेचा मुख्य उद्देश आहे.

या अभियानात उपचारांपेक्षा प्रतिबंधात्मक उपायांवर विशेष भर देण्यात येणार आहे. स्वच्छता, शुद्ध पाणीपुरवठा, सांडपाणी व्यवस्थापन, पोषण, तसेच संसर्गजन्य व असंसर्गजन्य आजारांवर नियंत्रण यावर लक्ष केंद्रित केले जाणार आहे. माता-बाल आरोग्य, मानसिक आरोग्य आणि जीवनशैलीशी निगडित आजारांनाही मोहिमेत विशेष प्राधान्य देण्यात आले आहे.

राज्य, विभाग, जिल्हा आणि ग्रामपंचायत स्तरावर समित्या स्थापन करण्यात येणार असून उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या गावांना “आरोग्यसंपन्न गाव” म्हणून गौरविण्यात येणार आहे. या उपक्रमासाठी राज्य शासनाकडून 65.25 कोटी रुपयांचे पुरस्कार देण्यात येणार आहेत.

या अभियानातून ग्रामीण महाराष्ट्रात निरोगी, सशक्त आणि समृद्ध समाज निर्माण होईल, असा विश्वास मंत्री Prakash Abitkar तसेच आरोग्य राज्यमंत्री Meghna Sakore-Bordikar यांनी व्यक्त केला.

Recent Posts