महाराष्ट्र खाकी ( नागपूर / विवेक जगताप ) – लाडक्या बहिणींचा विषय प्रत्येक गोष्टीत आणाल तर घरी बसावे लागेल मुख्यमंत्री फडणवीसांचा आमदार अभिमन्यू पवार यांना दम. आमदार अभिमन्यू पवार यांनी अवैध दारू या संबंधात प्रश्न विचारताना लाडक्या बहिणींचा विषय मध्ये घेतला तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस चिडले आणि आमदार पवार यांना घरी बसावे लागेल असा दम दिला. प्रत्येक विषयात लाडक्या
बहिणीचा विषय आणू नका, लाडक्या भहिनीच्या विरोधात जाऊ नका नाहीतर घरी बसावे लागेल असा दम मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी औसा मतदारसंघाचे आमदार अभिमन्यू पवार यांना दिला. सध्या सुरु असलेल्या हिवाळी अधिवेशन सुरु आहे. या अधिवेशनात आमदार अभिमन्यू पवार यांनी अवैद्य दारू संबंधात प्रश्न उपस्थित केला असता आमदार पवार बोलताना म्हणाले कि ग्रामीण भागातील आमदारांना या
अवैद्य दारू विक्री मुळे अडचणींचा सामना करावा लागत आहे. महिला सारखं अवैद्य दारू विरोधात तक्रारी करत असतात, आपण लाडक्या बहिणी म्हणुन इतक करतो मग या अवैद्य दारू विरोधात सरकार काय करत असा प्रश्न विचारला असता यावर मुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस हे बोलले आणि आमदार अभीमन्यू पवार यांना सरळ दम दिला, फडणवीस बोलताना म्हणाले कि माननीय सदस्यनीं प्रत्येक
गोष्टीत लाडक्या बहिणी आणू नका नाहीतर घरी बसावे लागेल, आणि लाडक्या भहिनीचे पैसे मिळत राहतील लडकी बहीण योजना बदलणार नाही, अध्यक्षांनी दिलेल्या निर्देशाची तात्काळ अंमलबजावणी करण्यात येईल असं यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. पण यातून एक गोष्टी दिसून आली कि लडकी बहीचा विषय आणला म्हणुन मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस चिडले आणि आपल्या लाडक्या आणि जवळच्या विश्वासू आमदार असलेल्या आमदार अभिमन्यू पवार यांना घरी बसावे लागेल असा दम ही दिला.





