औसा मतदारसंघाला राज्य सरकारच्या मदती नंतर (शॅडो मुख्यमंत्री) पवार सरकारची 90 लाखाची मदत जाहीर

महाराष्ट्र खाकी (औसा / विवेक जगताप ) – ऑगस्ट व सप्टेंबर महिन्यात मराठवाड्यावर कोसळलेल्या अतिवृष्टीने औसा मतदारसंघात शेतकरी आणि सामान्य माणसांचे जनजीवन विस्कळीत झाले. पिकांचे मोठे नुकसान, घरात पाणी शिरून घरसामानाचे व घरांचे नुकसान, जनावरांचे मृत्यू आणि काही ठिकाणी थेट जीवितहानी या संकटांनी शेतकरी व ग्रामस्थांचे कंबरडे मोडले. या कठीण काळात औसाचे आमदार

अभिमन्यू पवार यांनी नेहमीप्रमाणे पुढाकार घेत विचार माणुसकीचा, एक हात मदतीचा या भावनेतून सुमारे 90 लाख रुपयांची थेट मदत जाहीर केली आहे. ही मदत क्रीएटीव्ह फाऊंडेशन आणि अभय भुतडा फाऊंडेशनच्या माध्यमातून दिली जणार असून, शासनाकडून मिळणारी नुकसानभरपाई इतकीच रक्कम आमदार अभिमन्यू पवार यांच्या वतीने देखील दिली जाणार आहे. म्हणजेच, शासन जितकी मदत देईल

तितकीच मदत आ. अभिमन्यू पवार सेवाभावी संस्थांच्या माध्यमातून देतील, असा राजकीय नाही तर सामाजिक जाणिवेचा नवा आदर्श त्यांनी निर्माण केला आहे. अतिवृष्टी व पुरामुळे जीव गमावलेल्यांच्या वारसांना शासनाकडून 4 लाख व आ. अभिमन्यू पवारांकडूनही 4 लाख एकूण 8 लाख रुपये मिळणार आहेत. बैल दगावलेल्या शेतक-यांना शासनाच्या 32 हजार रुपयांइतकीच रक्कम आ. अभिमन्यू पवारांकडून गाय/

मौस दगावल्यास शासनाच्या 27.5 हजार रुपयांइतकीच मदत पवारांकडून दिली जाणार आहे. तसेच, वासरू, शेळी, कोंबड्‌या, पर पहणे किंवा घरात पाणी घुसणे अशा सर्व प्रकारच्या नुकसानीसाठी शासन जितकी मदत देईल, तितकीच भरपाई आ. अभिमन्यू पवार देणार आहेत. एकूण 1125 कुटुंबांना ही मदत मिळणार असून, दिवाळीपूर्वी विजय मंगल कार्यालय, औसा येथे एक विशेष कार्यक्रम आयोजित करून कृषिरत्न बी.

बी. ठोंबरे यांच्या हस्ते मदतीचे धनादेश व फूड पॅकेट्सचे वितरण होणार आहे. ही मदत पंचनाम्यावर आधारित असून संपूर्ण प्रक्रिया पारदर्शकपणे पार पडणार आहे.विशेष म्हणजे, शेत तिथे रस्ता, ग्रामसमृद्ध अशा उपक्रमांमधून औसा पॅटर्न निर्माण करणा-या आमदार अभिमन्यू पवारांनी आता मदतीचाही औसा पैटर्न उभा केला आहे. प्रशासनाची तत्परता, स्वतःची पाहणी,

मुख्यमंत्र्यांना दऱ्यास आणणे, पाठपुरावा आणि आता 90 लाखांची मदत हे सर्व म्हणजे केवळ प्रतिनिधीपद नको तर जनतेप्रती असलेली बांधिलकी या उपक्रमातून अधोरेखित होते. एक हात मदतीचा, विचार माणुसकीचा या तत्त्वावर आधारलेली ही मदत केवळ अर्थिक नसून, औसाच्या जनतेसाठी विश्वासाचा हात आणि आशेचा नवा किरण ठरतो आहे. यावेळी बोलताना

आ. अभिमन्यू पवार यांनी हन्यासाठी मदत मिळते, त्याच हेतूसाठी तिया वापर व्हावा अशी साद घालून सांगितले की, बैल दगावला असेल, तर मदतीने पुन्हा बैलच खरेदी करावाः गाय म्हैस दगावली असेल तर तीच पुन्हा ध्यावी हाच माणुसकीचा खरा अर्थ आहे. तरोथ, पीक आणि जमीन खरडून गेलेल्या शेतक-यांसाठी शासकीय नुकसानभरपाई कढवण्याचा पाठपुरावाही सुरु असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. ओसा

मतदारसंघातील जीवितहानी, पशुधनहानी गृहहानी झालेला 1125 कुटुंबांचा पंचनाम्यानुसार लेखाजोखा पूर्ण झाला असून, दिवाळीपूर्वी विजय मंगल कार्यालय, औसा येथे कृषिरज बी. बी. ठोंबरे यांच्या हस्ते मदतीचे धनादेश आणि फूड पैकट्स वाटप करण्यात येणार आहे, आ. अभिमन्यू पवार यांनी यावेळी सांगितले की, पीक व जमीन नुकसान भरपाई साठी ही शासनदरबारी सातत्याने पाठपुरावा सुरू आहे.