महाराष्ट्र खाकी (लातूर / विवेक जगताप ) – लातूर शहराच्या विकासात, वैभवात आणि लातूरचे नाव देश पातळीवर गाजवण्यात लातूरचे मा. महापौर विक्रांत गोजमगुंडे यांचे खूप मोठे योगदान राहिले आहे. लातूरचा विकास होण्यासाठी विक्रांत गोजमगुंडे सतत प्रयत्नशील असतात मग ते कुठल्या पदावर असोत वा नसोत. महापौर असताना विक्रांत गोजमगुंडे यांनी लातूरच्या वैभावात भर
टाकणारे अनेक प्रकल्प राबवले आहेत. त्यातीलच एक म्हणजे लातूर शहरातील जुनी रेल्वे लाईनच्या ठिकाणी नवीन अत्याधुनिक पद्धतीने रस्त्याचे काम सुरु आहे. या कामाची पाहणी विक्रांत गोजमगुंडे यांनी केले. माजी पालकमंत्री अमित विलासराव देशमुख यांच्या सूचनेवरून लोकनेते विलासरावजी देशमुख मार्गाचे काम प्रगतीपथावर आहे. तसेच विद्युत वहिनी स्थलांतरित करण्यात येत
आहेत. लातूरचे मा. महापौर विक्रांत गोजमगुंडे यांनी भेट देऊन कामाची पाहणी केली. लोकनेते विलासरावजी देशमुख मार्गामुळे लातूरच्या वैभवात भर पडणार आहे यात काही शंका नाही आणि त्याचबरोबर लातूर शहरातील मुख्य रस्त्यावरील ट्रॅफिकचा ताण कमी होवून ट्रॅफिकची अडचण कायमस्वरूपी मार्गी लागणार आहे. यावेळी विद्युत वहिनीची कामे वेळेत पूर्ण करण्याच्या सूचना मा. महापौर विक्रांत गोजमगुंडे यांनी संबंधिताना केल्या.


