किसान संघर्ष समिती, लातूर तर्फे केंद्र सरकारच्या विरोधात 26 मे काळा दिवस,काळा दिवस..

महाराष्ट्र खाकी (लातूर) – मोदी सरकारनं केलेल्या कृषी कायद्यांच्या विरोधात देशातील शेतकऱ्यांनी दिल्लीच्या सीमेवर सुरू केलेल्या आंदोलनाला आज सहा महिने पूर्ण होत आहेत. त्या निमित्तानं देशभर शेतकरी संघटनांकडून काळा दिवस पाळला जात आहे. देशातील 14 राजकीय पक्षांनी त्यास पाठिंबा दिला आहे. ठिकठिकाणी निदर्शने करून केंद्र सरकारविरोधातील संताप व्यक्त केला जात आहे. ही संधी साधत देशातील विरोधी पक्षांनी मोदी सरकारवर टीकेची झोड उठवली आहे.आज केंदातील मोदी सरकारची अत्यंत वाईट कारकीर्द सात वर्ष पुर्ण करत असताना व दिल्ली च्या सिमेवर लाखो शेतकरी शेतकरी विरोधी तीन कायदाच्या विरोधात ठाण मांडून बसले आहेत.अशी परिस्थिती असताना देखील भाजपा मोदी सरकार शेतकरी ,कामगार विरोधी कायदे रद्द न करता देशातील लोकशाही व्यवस्था मोडकळीला आणून देश अदाणी,अंबाणीच्या दावणीला बांधत आहे. म्हणून मोदी सरकारच्या शेतकरी ,कामगार विरोधी धोरणांच्या विरोधात आज किसान संघर्ष समन्वय समिती ,लातूर च्या वतीने काळ्या फिती हाताला बांधून व काळे झेंडे दाखवून निषेध दिन करण्यात आला यावेळी अॕड.भाई.उदय गवारे,भाई दत्ता सोमवंशी,अॕड.भाई सुशील सोमवंशी,अॕड.भाई भालचंद्र कवठेकर, धर्मराज पाटील,राजकुमार होळीकर,अॕड.शाबुद्दीन शेख,सुनील मंदाडे ,नामदेव बामणे,उल्हास गवारे,पवनराज पाटील इत्यादी उपस्थित होते.