Home » महाराष्ट्र » जिल्हाधिकारी भारत बास्टेवाड यांच्या नेतृत्वात लातूरमध्ये औद्योगिक क्रांतीचे पर्व, ३,०६६ कोटींची गुंतवणूक आणि ४,०००+ नवीन रोजगारांची संधी

जिल्हाधिकारी भारत बास्टेवाड यांच्या नेतृत्वात लातूरमध्ये औद्योगिक क्रांतीचे पर्व, ३,०६६ कोटींची गुंतवणूक आणि ४,०००+ नवीन रोजगारांची संधी

महाराष्ट्र खाकी ( लातूर / विवेक जगताप ) –  लातूर जिल्हाधिकारी डॉ. भारत बास्टेवाड यांच्या यशस्वी आणि गतिमान नेतृत्वाखाली लातूर जिल्ह्याच्या उद्योगविश्वात एका नव्या सुवर्णकाळाची सुरुवात झाली आहे. नुकत्याच पार पडलेल्या जिल्हास्तरीय गुंतवणूक परिषदेत लातूरच्या औद्योगिक विकासाला एक अभूतपूर्व चालना मिळाली असून, याद्वारे जिल्ह्यात ३,०६६ कोटी रुपयांची विक्रमी गुंतवणूक होत आहे. या ऐतिहासिक घडामोडीमुळे जिल्ह्यातील ४,१६९ हून अधिक तरुणांसाठी रोजगाराच्या नवीन आणि हक्काच्या संधी उपलब्ध होणार आहेत.

उद्योग क्रांतीचे हे पहिले पाऊल ठरणार अत्यंत महत्त्वाचे
1) ९२ विक्रमी सामंजस्य करार (MoU) –  महाराष्ट्र शासन आणि जिल्ह्यातील नवउद्योजकांमध्ये तब्बल ९२ महत्त्वाचे करार संपन्न झाले आहेत.
3) कृषी व अपारंपरिक ऊर्जा क्षेत्राला बळ –  पारंपारिक उद्योगांसोबतच अपारंपरिक ऊर्जा क्षेत्र, तसेच लातूरची विशेष ओळख असलेल्या सोयाबीन आणि डाळ प्रक्रिया उद्योगांना (कृषी आधारित उद्योग) यातून मोठी गती मिळणार आहे.

जिल्हाधिकारी भारात बास्टेवाड यांचे नेतृत्वात प्रशासनाचे भक्कम पाठबळ
उद्योगांच्या परवानग्यांमध्ये कोणतीही दिरंगाई होणार नाही, याची पूर्ण दक्षता जिल्हा प्रशासनाकडून घेतली जात आहे. बेलकुंड एमआयडीसी आणि लातूर विस्तारि MIDC मध्ये उद्योजकांसाठी लवकरच नवीन भूखंड उपलब्ध करून दिले जाणार आहेत. लातूर शहर द्रुतगती महामार्गाने जोडले जात असल्याने दळणवळण अधिक जलद आणि सुलभ होणार आहे.

मैत्री कक्ष’ आणि ‘जिल्हा उद्योग केंद्र’ तत्पर
नवउद्योजकांना हवी ती मदत, सर्व परवानग्या जलदगतीने मिळवून देणे आणि योग्य मार्गदर्शन करण्यासाठी ‘मैत्री कक्ष’ पूर्ण ताकदीने कार्यरत आहे. छत्रपती संभाजीनगर विभागात उद्योग व निर्यात क्षेत्रात लातूरने आपले दुसरे स्थान आधीच मजबूत केले असून, जिल्हाधिकारी डॉ. भारत बास्टेवाड यांच्या मार्गदर्शनाखाली होत असलेल्या या नव्या घडामोडींमुळे लातूर जिल्हा राज्याच्या औद्योगिक नकाशावर ठळक दिसेल यात शंका नाही.

Share This News

Related Post

National