Home » राजकीय » लातूरच्या पर्यटनाला नवी चालना देण्यासाठी आमदार अभिमन्यू पवार यांच्या प्रयत्नांमुळे खरोसा लेणी रस्ता चौपदरीकरणाच्या कामाला गती

लातूरच्या पर्यटनाला नवी चालना देण्यासाठी आमदार अभिमन्यू पवार यांच्या प्रयत्नांमुळे खरोसा लेणी रस्ता चौपदरीकरणाच्या कामाला गती

महाराष्ट्र खाकी (औसा / विवेक जगताप ) – खरोसा लेणीच्या चौपदरीकरणाचा मार्ग मोकळा; पर्यटनाला मिळणार नवी चालना! मुख्यमंत्र्यांच्या पुढाकाराने ऐतिहासिक खरोसा लेणीच्या कनेक्टिव्हिटीचा प्रश्न मार्गी, लातूर जिल्ह्यातील ऐतिहासिक आणि पर्यटनदृष्ट्या महत्त्वाच्या असलेल्या खरोसा लेणीपर्यंत जाणाऱ्या रस्त्याच्या चौपदरीकरणाचा मार्ग मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकाराने मोकळा झाला आहे. आमदार अभिमन्यू पवार यांनी पाठपुरावा केलेल्या या महत्त्वाच्या विषयाला प्रशासकीय पातळीवर गती मिळाली आहे.

मुख्यमंत्री यांच्या सोबतच्या बैठकीनंतर प्रशासकीय हालचालींना वेग मागील आठवड्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत पार पडलेल्या बैठकीत आमदार अभिमन्यू पवार यांनी खरोसा येथील ऐतिहासिक बुद्ध लेणीला जनकल्याण द्रुतगती मार्गाशी जोडण्याचा मुद्दा मांडला होता. लामजना ते खरोसा ते निलंगा या रस्त्याच्या चौपदरीकरणाचा या प्रस्तावात समावेश असून, मुख्यमंत्र्यांनी यावर तातडीने कारवाई करण्याचे निर्देश संबंधित विभागाला दिले होते. मुख्यमंत्र्यांच्या निर्देशानंतर महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे (MSRDC) उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक डॉ. अनिलकुमार गायकवाड यांच्यासोबत आमदार

अभिमन्यू पवार यांनी या कामाविषयी सविस्तर चर्चा केली.

लातूरच्या पर्यटनाला मिळणार मोठी चालना
खरोसा लेणीला भेट देणाऱ्या पर्यटकांची वाहतूक अधिक सुरक्षित व सुलभ व्हावी, या ऐतिहासिक स्थळाला उत्तम रस्ते कनेक्टिव्हिटी लाभावी आणि लातूर जिल्ह्यातील पर्यटन क्षेत्राला नवी चालना मिळावी, यासाठी हा रस्ता अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे. या महत्त्वपूर्ण मागणीवर सकारात्मक कार्यवाही सुरू झाल्याबद्दल आमदार अभिमन्यू पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि संबंधित प्रशासकीय अधिकाऱ्यांचे मनापासून आभार मानले आहेत.

Share This News

Related Post

National

सत्ताधारी नगरसेवकांच्या मुजोरीमुळे प्रशासनाचे मनोबल खचले, यापूर्वीही महिला अधिकाऱ्यांना चप्पल दाखविणे, अंगावर धावून जाण्याचे प्रकार; माजी महापौर विक्रांत गोजमगुंडे यांचा संतप्त सवाल