महाराष्ट्र खाकी ( लातूर / विवेक जगताप ) – लातूरच्या स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुधाकर बावकर उत्कृष्ट सेवा पदकाने सन्मानित कायदा व सुव्यवस्था अबाधित राखणे, नागरिकांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देणे आणि गुन्हेगारीवर प्रभावी नियंत्रण मिळवण्यासाठी प्रदीर्घ काळ निष्कलंक व गुणवत्तापूर्ण सेवा बजावणारे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुधाकर बावकर यांना मानाच्या ‘उत्कृष्ट सेवा पदका’ ने सन्मानित करण्यात आले आहे.
महाराष्ट्र राज्याचे पोलीस महासंचालक यांच्या वतीने जाहीर झालेले हे प्रतिष्ठित पदक, यंदाच्या स्वातंत्र्यदिनी लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या हस्ते अत्यंत मानदनीय सोहळ्यात प्रदान करण्यात आले.
कर्तव्यदक्ष आणि उत्कृष्ट कामगिरीचा गौरव
1) निष्ठा आणि कार्यतत्परता – पोलीस प्रशासनाची कार्यक्षमता वाढवण्यात आणि नागरिकांमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण करण्यात पोलीस निरीक्षक सुधाकर बावकर यांचे योगदान अत्यंत उल्लेखनीय ठरले आहे.
2) गुन्हेगारीवरचकस नियंत्रण – त्यांच्या मार्गदर्शनाखाली लातूर स्थानिक गुन्हे शाखेने अनेक गुन्हे उघडकीस आणत गुन्हेगारीवर यशस्वीरीत्या अंकुश ठेवला आहे.
3) प्रेरणादायी यश – त्यांच्या या थक्क करणाऱ्या आणि निष्कलंक सेवेचा सन्मान झाल्याने संपूर्ण पोलीस दलात आनंदाचे वातावरण असून, इतर अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी ही अभिमानास्पद बाब ठरली आहे.
कठीण प्रसंगातही धैर्याने व प्रामाणिकपणे कर्तव्य पार पाडणाऱ्या अशा कर्तव्यनिष्ठ अधिकाऱ्यांमुळेच समाज सुरक्षित राहतो. सुधाकर बावकर यांच्या या गौरवाने लातूर पोलीस दलाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे.




