महाराष्ट्र खाकी ( पुणे / विवेक जगताप )- पुणे गुन्हे शाखेचे पोलिस उपायुक्त निखील पिंगळे यांनी पोलिसी जबाबदारीकडे दुर्लक्ष केल्याप्रकरणी हडपसर पोलिस स्टेशन मधील दोन बीट मार्शल पोलिस शिपायांना निलंबित केले. IPS निखिल पिंगळे हे आपल्या कर्तव्यदक्ष आणि शिस्तप्रीय कार्य पद्धतीमुळे ओळखले जातात, त्यांच्या या कार्यपद्धतमुळे सध्या पुणे जिल्ह्यातील जनता पोलिसांच्या कामगिरमुळे समाधानी आहे.
याच समाधानी जनतेच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष केल्यामुळे आणि खाकीचे कर्तव्यात कसूर केल्यामुळे गुन्हे शाखेचे पोलिस उपायुक्त निखील पिंगळे यांनी दोन बिट मार्षल पोलिसांना निलंबित करून पोलिस दलातील काम चुकार कार्यपद्धतीला चाप लावला आहे. वेश्याव्यवसाय सुरू असल्याची माहिती ‘डायल 112’ वर प्राप्त झाल्यानंतर देखील त्या ठिकाणी वेळेत न पोहोचता पोलिसी जबाबदारीकडे दुर्लक्ष केल्याप्रकरणी
हडपसर पोलिस ठाण्यातील दोन बीट मार्शल पोलिस शिपायांना निलंबित करण्यात आले आहे. गुन्हे शाखेचे पोलिस उपायुक्त निखील पिंगळे यांनी याबाबतचे आदेश दिले आहेत. मुकुंद जयराम शिंदे आणि विजय हरिभाऊ पोटे अशी निलंबीत केलेल्या पोलिस कर्मचार्यांची नावे आहेत. दोघेही हडपसर पोलिस ठाणे हद्दीतील हडपसर कॉप्स 24 बीट मार्शल, गुन्हे शाखा, पुणे शहर येथे कार्यरत होते. शनिवारी (दि. 25) रात्री
साडेअकरा वाजता ‘डायल 112’ वरून एस. के. रेसिडेन्सी हॉटेल, 15 नंबर चौक, हडपसर येथे वेश्या व्यवसाय सुरू असल्याची तक्रार मिळाली होती. त्यावेळी दोन्ही शिपाई रात्रपाळीवर कर्तव्यावर होते. मात्र, कॉल आल्यानंतर त्यांनी तत्काळ घटनास्थळी पोहोचून तपासणी केली नाही. संबंधित कॉलचे गांभीर्य ओळखून आवश्यक ती कारवाई न केल्याने पोलिस दलाची प्रतिमा मलिन झाल्याचे आदेशात नमूद आहे.
तसेच, दोन्ही शिपायांनी कॉलची पुर्तता केली नसून, वरिष्ठ अधिकार्यांनाही घटनेबाबत कळविले नाही. कर्मचार्यांच्या या निष्काळजीपणाला ‘अत्यंत गंभीर व खेदजनक’ ठरवून त्यांच्या वर्तनामुळे पोलिस दलाच्या शिस्तीला बाधा निर्माण झाली असून त्यांचे आचरण ‘बेजबाबदार, बेफिकीर असल्याचे आदेशात म्हटले आहे. त्यानूसार या गैरवर्तनाबद्दल दोन्ही पोलिस कर्मचार्यांना निलंबित करण्यात आले आहे.
 
				 
								
 
															


