महाराष्ट्र खाकी ( लातूर / विवेक जगताप ) – लातूर महानगरपालिकेच्या कारभारात डिजिटल क्रांतीचा नवा अध्याय सुरू झाला आहे. महानगरपालिकेचे उपायुक्त (प्रशासन) पंजाबराव खानसोळे पाटील यांनी स्वतः अवघ्या ५ मिनिटांत ई-ऑफिस (e-Office) कार्यप्रणाली समजून घेतली आणि एका फाईलची मूव्हमेंट करून या प्रणालीचा शुभारंभ केला. ई-ऑफिस प्रणालीमुळे महानगरपालिकेतील फाईल्सची हालचाल जलद होणार आहे. कागदी कामकाज कमी होऊन प्रक्रिया अधिक पारदर्शक, वेगवान आणि आधुनिक होईल. यामुळे नागरिकांच्या विविध कामांना गती मिळणार असल्याचे सांगितले जात आहे.
उपायुक्त पंजाबराव खानसोळे पाटील म्हणाले
“ई-ऑफिस ही प्रणाली अतिशय सोपी आणि उपयुक्त आहे. केवळ ५ मिनिटांत मी ती समजून घेतली आणि लगेचच एक फाईल मूव्ह केली. महानगरपालिकेतील सर्व अधिकारी-कर्मचारी याचा वापर करून नागरिकांना अधिक चांगली सेवा देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.”
या उपक्रमामुळे लातूर महानगरपालिका डिजिटल शासनाच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल उचलत आहे. आगामी काळात सर्व विभागांमध्ये ई-ऑफिस पूर्णपणे लागू करण्याचे नियोजन असल्याचे सूत्रांनी सांगितले. लातूर महानगरपालिका प्रशासनाने नागरिकांना आवाहन केले आहे की, आता फाईल्स आणि कामे अधिक वेगाने पूर्ण होतील, त्यामुळे सर्वांनी सहकार्य करावे.




