महाराष्ट्र खाकी– ( नवी दिल्ली / प्रतिनिधी ) – लातूरच्या भूमीतून लोकशाहीचे आणि सामाजिक न्यायाचे धडे घेत संसद भवनात जनतेचे प्रतिनिधित्व प्रभावीपणे करणारे संसदरत्न व लोकमान्य माजी खासदार डॉ. सुनील बळीराम गायकवाड यांना यंदाचा “डॉ. अण्णाभाऊ साठे समाज भूषण पुरस्कार” जाहीर झाल्याची आनंदवार्ता समाजमनात उत्साहाचे वातावरण निर्माण करणारी ठरली आहे. हासन्माननवीदिल्लीयेथीलमहाराष्ट्र
सदनमध्ये एक भव्य आणि सन्माननीय समारंभात, मान्यवरांच्या साक्षीने त्यांना प्रदान करण्यात येणार आहे. स्मृतिचिन्ह आणि गौरव प्रमाणपत्र देऊन डॉ. गायकवाड यांचा हा सत्कार, सामाजिक समतेच्या लढ्याला दिलेला प्रतिष्ठेचा कृतज्ञ सलाम ठरणार आहे. डॉ. सुनील गायकवाड हे लातूरचे खासदार असताना शहीद पोचीराम कांबळे यांच्या स्मारकासाठी मतदारसंघा बाहेरही 10 लाखांचा निधीदेत, सामाजिक
बांधिलकीचे अनोखे उदाहरण घालून दिले. केवळ निधीपुरता मर्यादित न राहता, त्यांनी मातंग समाजातील होतकरू विद्यार्थ्यांना आर्थिक व शैक्षणिक मदतीचा हात देत त्यांचे भवितव्य घडवण्यासाठी अथक प्रयत्न केले. डॉ. अण्णाभाऊ साठे यांचे प्रेरणादायी विचार आणि त्यांचे क्रांतिकारी साहित्य, हे डॉ. गायकवाड यांच्या सामाजिक कार्याचा दिग्दर्शक राहिले आहेत. त्यातूनच त्यांनी समाजाच्या सर्व थरातील वंचित
घटकांमध्ये शैक्षणिक जागृती, सामाजिक समता आणि परिवर्तनवादी चळवळ उभी करण्याचे कार्य कृतीशील पातळीवर सिद्ध केले. आज, अण्णाभाऊंच्या विचारांचा खरा वारसदार म्हणून या सन्मानाने गौरवित होणाऱ्या डॉ. सुनील गायकवाड यांचं सर्व स्तरांतून अभिनंदन होत आहे. लातूर जिल्हा, मराठवाडा आणि महाराष्ट्रासाठी हा अभिमानाचा क्षण आहे. हा पुरस्कार म्हणजे केवळ सन्मान नव्हे, तर सामाजिक
परिवर्तनाच्या वाटचालीतील एक महत्त्वाची पावती आहे. “लोकसत्ता ही देवता आहे आणि लोककल्याण हेच तिचं साध्य आहे” — हे ब्रीद घेऊन कार्य करणाऱ्या या लोकप्रतिनिधीला, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या नावाने दिला जाणारा हा पुरस्कार एक प्रकारे जनतेचं आभार प्रदर्शन आहे. “मनाचा ठाव घेणाऱ्या लोकप्रतिनिधीला, समाजमनाचा मानाचा मुजरा! ” डॉ. सुनील बळीराम गायकवाड यांचे सर्वत्र अभिनंदन आणि हार्दिक शुभेच्छा चा वर्षाव होत आहे.
