महाराष्ट्र खाकी (लातूर / प्रतिनिधी ) – “पती खंडेराव होळकर, सासरे महापराक्रमी सुभेदार मल्हारराव होळकर व एकुलता एक पुत्र मालेराव होळकर यांच्या अकाली निधनापश्चातसुद्धा होळकरांचे राज्य सक्षमपणे चालवून स्त्री सुद्धा पुरुषांइतकीच निर्भीड, पराक्रमी कणखर व मुत्सद्दी असू शकते हे लोकमाता राजमाता अहिल्यादेवी होळकर यांनी
दाखवून दिले. त्यांनी जवळपास 28 वर्ष अत्यंत निर्मळ,स्वच्छ व पारदर्शक राज्यकारभार करून आपल्या प्रजेला सुखी करण्याचं काम केलं. “असे प्रतिपादन सुप्रसिद्ध वक्ते व इतिहास अभ्यासक प्रा.विक्रम कदम यांनी केले. जय मल्हार मित्रमंडळ (सेलू ता औसा,जि लातूर) आयोजित लोकमाता राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जयंतीनिमित्त ते बोलत
होते. “आपल्या राज्याबाहेरसुद्धा देशातील अनेक तिर्थक्षेत्रांवरील नद्यांवर घाट बांधण्याचे तसेच अनेक महत्त्वपूर्ण प्राचीन मंदिरांचा जीर्णोद्धार करण्याचे काम अहिल्यादेवींनी केलं. राज्यावर चालून येणाऱ्या प्रत्येक शत्रूवर त्यांनी जरब बसवली.”स्त्री राज्य करत आहे आपण तिचा सहज पराभव करू अशा गैरसमजात राहू नका. हातात तलवार घेऊन रणांगणात उतरून तुमचा पराभव
करेन. तेवढी धमक माझ्या मनगटात आहे.”असे खडे बोल त्यांनी होळकरांच्या राज्यावरआक्रमण करणाऱ्यासाठी आलेल्या राघोबा पेशव्याला सुनावले. त्यांच्यासमोर अनेकांना रणांगणातून माघार घ्यावी लागली. “असेही ते म्हणाले. यावेळी गणेश विद्यालय, सेलू येथील इयत्ता दहावीच्या परीक्षेत भरघोस यश मिळवणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांचा लोकमत आहिल्यादेवी
होळकर जयंती उत्सव समितीच्या वतीने मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. याप्रसंगी कार्यक्रमाला सिदाजी कदम, ग्रामपंचायत सदस्य खंडेराव लांडगे, बाबुराव आरेकर, सालार पटेल, सुभाष माने, बालाजी पाटील, ज्ञानोबा पवार, धर्मराज पवार, अनिल मंगळगीरे, बालाजी कदम, बाबुराव दंडे,दशरथ लांडगे, वैजनाथ बंडगर, विकास बंडगर,तसेच सुभेदार मल्हारराव होळकर व लोकमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या विचारावर प्रेम करणारे अनेक तरुण व ग्रामस्थ कार्यक्रमासाठी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
