Home » पोलीस » LCB PI सुधाकर बावकर व दत्तात्रय शिंदे यांच्या उत्कृष्ट नियोजनाची कमाल,३० वर्षांपासून फरार फसवणूक आरोपीला LCB च्या पथकाने केली बीडमधून अटक

LCB PI सुधाकर बावकर व दत्तात्रय शिंदे यांच्या उत्कृष्ट नियोजनाची कमाल,३० वर्षांपासून फरार फसवणूक आरोपीला LCB च्या पथकाने केली बीडमधून अटक

महाराष्ट्र खाकी ( लातूर / विवेक जगताप ) –  तब्बल ३० वर्ष न्यायालय व पोलिसांना गुंगारा देत फरार असलेल्या फसवणुकीच्या गुन्ह्यातील ७० वर्षीय आरोपीला लातूर पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या (LCB) विशेष पथकाने बीड जिल्ह्यातून शोधून अटक केली. ही यशस्वी कारवाई LCB चे पोलीस निरीक्षक सुधाकर बावकर आणि पोलिस हवालदार दत्तात्रय शिंदे यांच्या उत्कृष्ट नियोजनामुळे आणि त्वरित अंमलबजावणीमुळे शक्य झाली.

सन १९९५ मध्ये शिवाजीनगर पोलिस ठाण्यात दाखल गु.र.नं. ३५/१९९५ अंतर्गत आरोपी दत्तू भगवान डावकरे (वय ७० वर्षे, मूळ रा. मित्रनगर लातूर, सध्या अंजनपूर, ता. अंबाजोगाई, जि. बीड) याच्यावर फसवणूक व विश्वासघातकी वर्तनाचे आरोप होते. आरोपीने फिर्यादीच्या मुलाला पोलीस दलात भरती करून देण्याचे आमिष दाखवत ६,५०० रुपये घेतले होते. पैसे परत मागितल्यावर फक्त २,५०० रुपये दिले आणि उर्वरित रकमेचा धनादेश दिला, जो बाउन्स झाला. याप्रकरणी आरोपीला अटक झाली होती, परंतु न्यायालयीन प्रक्रियेदरम्यान तो फरार झाला. अनेक वर्षे अटक वॉरंट, नॉन-बेलेबल वॉरंट आणि जाहीरनामा असूनही तो पोलिसांच्या हाती लागत नव्हता.

पोलिस अधीक्षक अमोल तांबे यांच्या निर्देशानुसार, अपर पोलिस अधीक्षक मंगेश चव्हाण यांच्या मार्गदर्शनात LCB च्या विशेष मोहिमेत पोलीस निरीक्षक सुधाकर बावकर यांनी पथकाची आखणी केली. दत्तात्रय शिंदे यांना गोपनीय माहिती मिळाली की आरोपी बीड जिल्ह्यातील युसुफवडगाव परिसरात वास्तव्य करत आहे. या माहितीची खातरजमा करून वरिष्ठांच्या सूचनेनुसार स्थानिक पोलिसांच्या मदतीने आरोपीला धरले. त्यानंतर त्याला शिवाजीनगर पोलिस ठाण्यात हजर करून न्यायालयासमोर सादर करण्यात आले. न्यायालयाने आरोपीला न्यायालयीन कोठडी सुनावली.

LCB PI सुधाकर बावकर आणि दत्तात्रय शिंदे यांच्या कुशल नियोजनामुळे ही दीर्घकाळ प्रलंबित कारवाई यशस्वी झाली. पथकातील पोलीस उपनिरीक्षक संजय भोसले, पोलिस अंमलदार चंद्रकांत केंद्रे आणि युसुफवडगाव पोलिस ठाण्याचे सफौ अरुण मोरे यांच्या सहकार्याने ही कारवाई पार पडली.
लातूर पोलिस दलाने पुन्हा एकदा सिद्ध केले की, कितीही वर्षे झाली तरी गुन्हेगारांना खाकीचा हात कधीच सुटत नाही. PI सुधाकर बावकर व दत्तात्रय शिंदे यांच्या अशा आक्रमक आणि नियोजित कारवायांमुळे फरार आरोपींना कडक इशारा मिळाला आहे.

Share This News

Related Post

National