महाराष्ट्र खाकी ( निलंगा / विवेक जगताप ) – मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्यावर SIT चोकशीची आणि अटक करण्याच्या मागणीवर पूर्ण ताकतीने आणि पूर्ण जोश मध्ये अधिवेशनात समर्थन देऊन जोर – जोरात टेबल वाजवणारे माजी मंत्री आमदार संभाजी पाटील निलंगेकर यांना निलंगा तालुक्यातील
मराठा समाजाने माफ केले असे दिसत आहे. निलंगा तालुक्यातील मराठा समाज अंतरवाली सराटी येथे महिलांवर झालेला लाठी हल्ला आणि गोळीवर विसरेल आहेत असे या समर्थनातून दिसून येत आहे. निलंगा मतदारसंघात निघालेल्या जनसन्मान पदयाञेस मराठा क्रांती मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी जाहीर पाठींबा देत आमदार
संभाजी पाटील निलंगेकर यांच्या निघालेल्या पदयाञेत सहभागी होऊन पाठींब्याचे पञ दिले. मराठा क्रांती मोर्चाच्या समर्थनाची बातमी संभाजी पाटील निलंगेकर यांचे PRO सुजित नाईक यांनी ही बातमी शेअर केली आहे. पण मराठा क्रांती मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी समर्थनाचे पत्र दिले असे सांगितले पण सुजित नाईक यांनी तो फोटो
टाकला नाही आणि त्या मराठा क्रांती मोर्च्याच्या कार्यकर्त्यांची नावे टाकली नाहीत . पूर्ण मराठा समाजात सत्ताधाऱ्याबद्दल जास्त नाराजी असताना निलंगा तालुक्यातील मराठा क्रांती मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी असे समर्थन देणे म्हणजे मराठा समाजावर होत असलेला अन्याय आणि महिलांवर झालेला गोळीबार आणि लाठी हल्ला माफ केला
का असा प्रश्न जिल्ह्यातील मराठा समाजात निर्माण झाला आहे. का यातून मराठा समाजात फूट पडली म्हणावे का ? किंवा आमदार निलंगेकरांच्या जनसन्मान पदयाञेस मराठा समाजाचे समर्थन आहे असे निलंगेकर दाखवत आहेत. आधीच निलंगेकर यांच्यावर मनोज जारांगे पाटील आणि मराठा समाजाचा खूप नाराज आहेत यात
आणखीन भर नक्की पडेल यात शंका नाही. पण या सर्व प्रकारबाबत निलंगा मराठा क्रांती मोर्च्याने स्पष्टीकरन द्यावे ही मराठा समाजाची मागणी राहील..!