महाराष्ट्र खाकी ( औसा / विवेक जगताप ) – महाराष्ट्राच्या राजकारणातील एक ज्येष्ठ नेते, औसा मतदारसंघाचे आमदार आणि पूर्ण महाराष्ट्रासाठी ‘शॅडो मुख्यमंत्री’ म्हणून ओळखले जाणारे अभिमन्यू पवार यांचा वाढदिवस आज राज्यभरात मोठ्या उत्साहात साजरा झाला. विधानभवनात मुख्यमंत्री, मंत्री, विविध पक्षातील नेते यांनी त्यांना भेटून शुभेच्छा दिल्या. मात्र या सर्व शुभेच्छांमध्ये सर्वात जास्त भावनिक आणि हृदयाला स्पर्श करणारी शुभेच्छा होती ती त्यांच्या लाडक्या लेकी परीक्षित पवार यांची. परीक्षित पवार यांनी आपल्या वडिलांना उद्देशून लिहिलेली पोस्ट फक्त एक शुभेच्छा नव्हती, तर एका लेकीचे वडिलांवरचे असीम प्रेम, आदर आणि कृतज्ञता व्यक्त करणारा भावनिक संदेश होता. त्या पोस्टमध्ये त्या म्हणतात:
“प्रिय बाबा,
माझ्या आयुष्यात ‘बाबा’ हा फक्त एक शब्द नाही, तर तो माझा आत्मविश्वास, माझी ताकद आणि प्रत्येक संकटात खंबीरपणे उभा असणारा आधारवड आहे…”
परीक्षित पवार यांनी पुढे आपल्या वडिलांच्या राजकीय आणि सामाजिक योगदानाचे स्मरण करताना लिहिले की, जनतेसाठी केलेला निस्वार्थ संघर्ष, समाजासाठी वाहिलेले आयुष्य, लोकांच्या चेहऱ्यावर आनंद फुलवण्यासाठी घेतलेले कष्ट आणि विशाल मन पाहतच त्या मोठ्या झाल्या. वडिलांकडून मिळालेले संस्कार, प्रामाणिकपणा आणि जनसेवेची शिकवण हेच त्यांच्या आयुष्याची खरी संपत्ती असल्याचे त्यांनी सांगितले.
“आपण दाखवलेल्या वाटेवर चालणे, आपल्या विचारांचा आणि जनसेवेच्या व्रताचा वारसा जपणे, हेच माझ्यासाठी सर्वात मोठे भाग्य आहे,” असे भावपूर्ण शब्द लिहिताना परीक्षित यांनी वडिलांच्या सावलीतून मिळणाऱ्या ताकदीचे वर्णन केले. शेवटी त्या आई जगदंबेच्या चरणी प्रार्थना करतात की, त्यांच्या लाडक्या बाबांना निरोगी, आनंदी आणि दीर्घायुष्य लाभो.
ही पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल झाली असून, अनेकांनी तिचे भरभरून कौतुक केले. अभिमन्यू पवार यांनीही या पोस्टला विशेष प्रतिसाद देत आपल्या लेकीच्या भावनांना मान्यता दिली.
एक वडील आणि एक लेक…
अभिमन्यू पवार यांच्यासाठी हा वाढदिवस केवळ राजकीय शुभेच्छांचा नव्हता, तर कुटुंबीयांच्या प्रेमाने भरलेला होता. परीक्षित पवार यांची ही भावनिक पोस्ट पुन्हा एकदा सिद्ध करते की, राजकारण कितीही मोठे असले तरी, घरातला ‘बाबा’ हाच प्रत्येकाच्या आयुष्यातला सर्वात मोठा आधारवड असतो. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा



