महाराष्ट्र खाकी ( नांदेड / प्रतिनिधी ) – नीट निकाला संदर्भातील 25 लाख विद्यार्थ्यांच्या भविष्याशी निगडीत असलेल्या विद्यार्थी आणि पालकांच्या प्रश्नाकडे प्रशासकीय व राजकीय स्तरावरील वरिष्ठांचे लक्ष वेधण्यासाठी आयआयबीच्या वतीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदें आणि विरोधी पक्षनेते नानासाहेब पटोले यांना भेटून नीट निकाला
संदर्भात सविस्तर निवेदन दिले असून त्यासोबतच माजी मंत्री आणि विधिमंडळ पक्ष नेते बाळासाहेब थोरात यांना या घटनेची सविस्तर माहिती आयआयबीचे संचालक प्रा.बालाजी वाकोडे यांनी यावेळी दिली आहे. याबाबत सविस्तर वृत्त असे की, नॅशनल टेस्टिंग एजन्सी (एनटीए) आणि राष्ट्रीय पात्रता कम प्रवेश परीक्षा (निट) च्या
प्रशासनासंबंधी नुकत्याच झालेल्या निट परीक्षेदरम्यान नोंदवलेल्या विविध अनियमितता आणि विंसगतींमुळे विद्यार्थी आणि पालक व्यथित आहेत. निट परीक्षा आयोजित करताना गैरव्यवहार, प्रश्नपत्रिका फुटणे, तांत्रिक त्रुटी आणि इतर गंभीर समस्यांचे मोठ्या प्रमाणावर आरोप झाले आहेत, असे असंख्य मीडिया रिपोर्ट्स व विद्यार्थी
आणि शिक्षकांच्या प्रत्यक्ष लेखांद्वारे सामान्य जनतेच्या लक्षात आले आहे. या घटनांमुळे केवळ परीक्षा प्रक्रियेच्या प्रामाणिकपणावर आणि निष्पक्षतेवरच शंका निर्माण झाली नाही तर या महत्त्वपूर्ण परीक्षेची तयारी करण्यासाठी परिश्रम घेतलेल्या इच्छुकांमध्ये अनावश्यक ताण आणि चिंता निर्माण झाली आहे. या आरोपांचे गांभीर्य आणि
लाखो विद्यार्थ्यांच्या भवितव्यावर होणारे संभाव्य परिणाम लक्षात घेता, एनटिए द्वारे निट परीक्षा आयोजित करण्याबाबत सखोल आणि निष्पक्ष तपास करणे अत्यावश्यक आहे त्यामुळे या प्रकरणाची सर्वमसावेशक चौकशी सुरु करण्यासाठी केंद्रीय अन्वेषण ब्युरो (सिबीआय) ला निर्देश द्यावेत अशी विनंती आयआयबीच्या वतीने निवेदनाव्दारे वरीष्ठ नेत्यांकडे करण्यात आली आहे