महाराष्ट्र खाकी (लातूर / विवेक जगताप ) -स्वच्छतेची लगबग भारी प्रभू रामचंद्राच्या आगमनाची कास न्यारी महाराष्ट्र भाजपा प्रवक्त्या प्रेरणा होनराव यांनी जेष्ठ सहकारी आणि युवा सहकार्याच्या सोबत काशी विश्वेश्वर मंदिर परिसर स्वच्छ करून, उत्तम रोषणाई केली. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या
आवाहनानुसार ठिकठिकाणच्या धार्मीक स्थळी स्वच्छता अभियान राबविण्यात येत आहे. अयोध्येत प्रभू श्रीराम मंदिराचा प्राण प्रतिष्ठा सोहळा उद्या (22 जानेवारी ) होत आहे. त्यामुळे भारतभरातील श्रद्धास्थाने स्वच्छ ठेवावी असे आवाहन पंतप्रधान मोदी यांनी केले आहे. महाराष्ट्रात देखील स्वच्छता
अभियानाला उदंड प्रतिसाद मिळतोय, त्यानुसार आज 21 जानेवारी रोजी लातूर शहरातील काशी विश्वेश्वर मंदिर परिसरात स्वच्छता अभियान राबविण्यात आले. या प्रसंगी महाराष्ट्र भाजपा प्रवक्या प्रेरणा होनराव यांनी स्वयंस्फूर्तीने स्वच्छता केली. हातात झाडू घेऊन सहकारी जेष्ठ सहकारी आणि युवा सहकारी यांच्या सोबत त्यांनी स्वच्छता अभियानात सक्रिय सहभाग नोंदविला.