महाराष्ट्र खाकी (हरिद्वार / प्रतिनिधी ) – दक्षिण भारतात हरिद्वार येथे भारतीय किसान युनियनच्या राष्ट्रीय चिंतन शिबिरात (किसान कुंभमेळा) मराठवाडा अध्यक्ष नेहरू देशमुख यांनी महाराष्ट्र सरकारला जोरदार दणका दिला.
नेहरू देशमुख म्हणाले, “महाराष्ट्रात शेतकऱ्यांना कोणत्याच सुविधा मिळत नाहीत. ज्या सुविधा आहेत त्या मिळेपर्यंत शेतकरी थकून जातो. उत्तर भारतात राकेश टिकैत यांच्या नेतृत्वात शेतकऱ्यांनी एकत्र येऊन आंदोलन केले, तसेच असे आंदोलन आता महाराष्ट्रातही करण्यात येईल.”
नेहरू देशमुख यांच्या भाषणातील मुख्य मागण्या
1) सोयाबीनला योग्य हमी भाव मिळावा
2) ऊस बिल लवकरात लवकर शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करावे
3) शेतकऱ्यांसाठी सर्व सरकारी योजनांची एक खिडकी व्यवस्था करावी
4) शेतकऱ्यांना वीज बिल मोफत द्यावे, स्मार्ट मीटरची सक्ती बंद करावी
ते पुढे म्हणाले, “राकेश टिकैत यांच्या नेतृत्वाखाली उत्तर भारतातील शेतकऱ्यांना न्याय मिळवून दिला, त्याच धर्तीवर महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी आम्ही पूर्ण प्रयत्न करू.” भारतीय किसान युनियन आता महाराष्ट्रात शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी आक्रमक भूमिका घेणार असल्याचे संकेत नेहरू देशमुख यांच्या भाषणातून स्पष्ट झाले आहेत.



