महाराष्ट्र खाकी ( निलंगा / प्रशांत साळुंके ) – माजी पालकमंञी आमदार संभाजीराव पाटील निलंगेकर यांनी जल साक्षरता अभियानाचे प्रणेते म्हणून उद्यास आले त्यांना या रॅलीव्दारे मराठवाड्याचे नेते म्हणून ओळखले जाते राज्यात सत्ताबदल होऊन महायुतीचे सरकार आले आणि निलंगा विधानसभा मतदारसंघात विकास निधींचा
ओघ मोठ्या प्रमाणात सुरू झाला.नुकतेच निलंगा शहरात 18 कोटींचे विकासकामे प्रगतीपथावर असताना नुकतेच शहरातील विविध विकासकामासाठी राज्यस्तरीय व जिल्हास्तरीय विशेष बाब म्हणून आमदार संभाजीराव पाटील निलंगेकर व प्रदेश सचिव अरविंद पाटील निलंगेकर यांच्या प्रयत्नातून 20 कोटींच्या कामाला मंजुरी मिळाली
आहे. निलंगा शहरातील मिलिंद नगर स्मशानभूमी विकास अशोक नगर मुलांचे वस्तीगृृह येथे वाचनालय व्यायामशाळा परिसर विकास करणे अशोक नगर समाज मंदीर सुधारणा व सुशोभिकरण,सम्राट नगर इंद्रजीत कांबळे यांचे घर ते अशोक नगरकडे जाणारा अॅप्रोच रस्ता,शहरातील लातूर-बिदर रोड राज्यमार्ग ते शांतीवन
स्मशानभूमीकडे जाणारा रस्ता व नाली,बॅंक काॅलनी रोड सोलापुरे यांचे घर-अजित माकणे घरापर्यंत नाली करणे,शिवाजीनगर दक्षिण भागातील अमजत मासुलदार ते शेख बेकरी पर्यंतचा रस्ता डांबरीकरण करणे, शिवाजीनगर दक्षिण भागातील दिपक पवार यांचे घर ते उर्दु शाळा ते अमजत मासुलदार यांचे घरा पर्यंतचा रस्ता
डांबरीकरण,गणेश नाईकवाडे यांचे घर ते जाकीर मासुलदार व सुरवसे यांचे घर रस्ता,अहंकारी हाॅस्पीटल ते सद्रगुरू प्री-इंग्लिश स्कुलकडे जाणारा रस्ता,बिदर रोड भारतबाई गिरणी ते बाजार समितीकडे जाणारा रस्ता,बिदर रोड,अॅड.वाघमारे यांचे घर ते पशु दवाखाना रस्ता,शिवशक्ती लाॅज ते पशु दवाखाना रस्ता,महेबुब गंज
पेठ येथील दत्त मंदिर ते चंद्रकांत चोपणे यांचे घरापर्यंतचा रस्ता,चावडी ते कासारशिरसी रोडपर्यंतचा रस्ता,चावडी ते मिरगाळे आप्पा यांचे घरापर्यंतचा रस्ता,मार्केट यार्ड वाजीद ट्रेडर्स यांचे दुकान पासून ते मौला मणियार यांचे घरापर्यंतचा रस्ता,यशोदा बार ते पाशामियाॅं आत्तार यांचे घरापर्यंतचा रस्ता,लाडले मिस्ञी यांचे घर ते शफीक टेलर
यांचे घर रस्ता,भगीरथी नगर येथील अंतर्गत भागातील भिंगोले यांचे घरासमोरील व शंकरप्पा पुरके आप्पा यांच्या घरासमोरील अंतर्गत रस्ता व नाली,नारायण नगर,दक्षिण भागातील अंतर्गत रस्ते व नाली विकसित,इनामवाडी येथील लातूर बिदर रोड ते सर्वे नं.72 ते शिंदे वस्ती ते गुराळ कडे जाणारा रस्ता,शिवाजीनगर उत्तर,पांचाळ
काॅलनी,बसवेश्वर नगर,महालक्ष्मी काॅलनी, एस. टी. काॅलनी, ज्ञानेश्वर नगर येथील अंतर्गत रस्ते व नाली, औरंगपुरा येथील गणी आईस्क्रीम कारखाना ते वजीर चौधरी यांचे घरापर्यंतचा रस्ता,छञपती शिवाजी चौक ते बॅंक काॅलनी पर्यंतचा रस्त्याचे दुतर्फा बंदिस्त नाली, लालबहादुर शास्ञी शाळा ते बॅंक काॅलनी कडे जाणार्या
रस्त्यास दुतर्फा नाली,मुसा खुरेशी ते मिनाज बागवान व हतागळे काॅम्पलेक्स ते अमीरसाब मासुलदार यांचे घराकडे जाणार्या रस्त्यास दुतर्फा नाली,पांचाळ काॅलनी मधील गुणवंत पांचाळ ते काळगे सर यांचे घराकडे जाणार्या रस्त्याच्या दुतर्फा नाली,विद्यानगर येथील वागदरे यांचे घर ते बिराजदार यांचे घराकडे नाली,लोंढे नगर,सरस्वती
काॅलनी,मथुरा नगर,सरस्वती काॅलनी,प्रभाग क्र.तीन, चार,पाच,सहा,सात,नऊ,मधील रस्ते नाली आदी कामांचा समावेश असून यासाठी 20 कोटी रूपये मंजुर झाले आहेत.ही कामे पंधरा दिवसांत सुरू होतील,असे माजी नगराध्यक्ष बाळासाहेब शिंगाडे यांनी सांगितले.