महाराष्ट्र खाकी ( लातूर/ विवेक जगताप ) – लातूर शहरातील प्रभाग 5 मधील श्रीकृष्ण नगर चौक येथे प्रभागातील जनतेस हक्काचे व्यासपीठ उपलब्ध करून देत नागरी समस्या सोडविण्यासाठी लातूर मध्ये पहिल्यांदा अभिनव आणी लोकांभिमुख “जनता दरबार” हा उपक्रम माजी महापौर विक्रांत गोजमगुंडे यांनी राबविला.
लातूरचे माजी महापौर विक्रांत गोजमगुंडे यांनी त्यांच्या कार्यशैलीने लातूर महानगरपालिकेचे नाव राज्य आणी देशपातळीवर गाजविले आहे, माजी महापौर विक्रांत गोजमगुंडे यांनी आपल्या महापौर पदाच्या काळात लातूरच्या विकासासाठी आणी नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी वेगवेगळ्या योजना, उपक्रम राबविले
आणी ते नागरिकांनाच्या पसंतीस उतरले म्हणून लातूरकरांच्या मनातील सर्वात कर्तृत्ववान आणी क्रियाशील महापौर म्हणून त्यांची ओळख आहे. माजी महापौर विक्रांत गोजमगुंडे यांची हिच क्रियाशीलता प्रभाग 5 मधील श्रीकृष्ण नगर चौक येथे पार पडलेल्या जनता दरबार या अभिनव उपक्रमातून दिसून आली .लातूर मधील
प्रभाग 5 चे प्रतिनिधीत्व करीत महापौर पदावर कार्यरत राहिलेले लातूरचे माजी महापौर विक्रांत गोजमगुंडे यांनी त्यांच्या प्रभागात जनता दरबार हा लोकाभिमुख उपक्रम राबवित नागरिकांशी थेट संवाद साधला. यावेळी नागरिकांनी मांडलेल्या समस्यांपैकी अनेक समस्या जागेवरच सोडविण्यात आल्या तर कांही समस्या
प्रशासकीय स्तरावरील असल्याने त्याही लवकरात लवकर सोडविण्याबाबत माजी महापौर विक्रांत गोजमगुंडे यांनी नागरिकांना आश्वस्त केले. माजी महापौर विक्रांत गोजमगुंडे हे सतत जनसंपर्कात असतात. प्रभागासह शहरातील नागरिक नेहमीच आपल्या समस्या त्यांच्याकडे मांडत असतात. त्या सोडविण्यातही विक्रांत गोजमगुंडे
अग्रेसर असतात.आता कोणत्याही निवडणुका तोंडावर आलेल्या नसताना तसेच आपला महापौर व नगरसेवक पदाचाही कार्यकाळ संपलेला असताना त्यांच्याकडून जनता दरबारच्या माध्यमातून जनतेची गाऱ्हाणे ऐकली जात आहेत. निवडणुकीस अजुनही बराच अवकाश आहे. असे असताना जनता दरबार आयोजित करत नागरी
समस्या सोडविण्याच्या या उपक्रमाचे सर्वांनीच कौतुक केले. या जनता दरबारास उपस्थित मनपा अधिकाऱ्यांनी कार्यतत्परता दाखवत नागरिकांच्या समस्या सोडविण्यास मदत केली. यावेळी माजी नगरसेविका सौ.पुजाताई पंचाक्षरी, डॉ.सौ.फरजाना बागवान, सुभाषप्पा पंचाक्षरी, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश सचिव इब्राहिम सय्यद,माजी
नगरसेवक सोमनाथ झुंजारे,काँग्रेस सोशल मीडिया सेलचे अध्यक्ष रामभाऊ गोरड, यशपाल कांबळे, खाजामिया शेख, जयकुमार ढगे, इब्राहिम शेख बोरीकर,हमीद बागवान,चेतन कोले, राम सुर्यवंशी, बालाजीराव माने, विशाल चामे, गजभार सर, साखरे गुरुजी, आकाश गायकवाड, धनराज कांबळे, अमजद शेख, पडीले सर,
मुस्तकीम पटेल, केदार सर, बालाजी केदार,अब्दुल्ला शेख, मनपा अधिकारी अकबर शेख, फिस्के, आशिष साठे, रवी शेंडगे, महादेव धावारे, रहीम शेख यांच्यासह प्रभागातील नागरिक उपस्थित होते.