महाराष्ट्र खाकी ( निलंगा / प्रशांत साळुंके) – निलंगा तालुक्यातील निटूर महसूल मंडळ व पानचींचोली महसूल मंडळामध्ये मंगळवारी सायंकाळी झालेल्या वादळी वारे व पावसामुळे शेतकऱ्याचा ऊस हा भुईसपाट झाला आहे तर रब्बीचे ज्वारी,हरभरा व खरिपाची तूर हे पीक सुद्धा जमीन दोस्त झाले आहे. त्यामुळे हाताला आलेले पीक मातीमोल
होत झाले. मात्र कालपासून कोणताच लोकप्रतिनिधी, महसूलचा कृषीचा अधिकारी शेतकऱ्यांच्या बांधावर पंचनामा करण्यासाठी फिरकला सुद्धा नाही वर्षभर कष्ट करून पिकवलेला ऊस भुईसपाट झाल्याने शेतकरी चांगलाच आर्थिक संकटात सापडला आहे. तात्काळ दोन दिवसात जर तो ऊस कारखान्याला नाही गेला तर
वर्षभराची मेहनत ही निष्फळ ठरणार आहे. त्यामुळे प्रामुख्याने निटूर महसूल मंडळ व पानचिंचोली महसूल मंडळातील केळगाव, मसलगा, ताजपुर मुगाव, शेंद,कलांडी,बसपुर, माचरटवाडी, खडकउमरगा, राठोडा,काटेजवळगाव, या गावात प्रामुख्याने उसाचे मोठ्या प्रमाणात नुकसान होऊन चार चार एकरचे उसाचे
फळ हे भुईसपाट झाले आहे. केळगाव येथील उसाचा अर्धा शिवार भुईसपाट झाला आहे.याची दखल कोणत्याही लोकप्रतिनिधींनी घेतली नसल्याने शेतकऱ्यात असंतोष निर्माण आहे. त्यामुळे आज निटूर महसूल मंडळ व पानचिचोली महसूल मंडळातील शेतकऱ्यांनी तहसीलदारांना निवेदन देऊन तात्काळ पंचनामा करून
ऊस कारखान्याला घेऊन जाण्याची मागणी केली व रब्बीची नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी यावेळेस करण्यात आली याची दखल नाही घेतल्यास चार तारखेला तहसील कार्यालयाच्या परिसरात चूल मांडू आंदोलन करून प्रशासनाचा निषेध करण्यात येणार असल्याचेही निवेदनामध्ये नमूद करण्यात आले आहे. निवेदनावर
शेतकरी दासभैया साळुंखे, सुरेंद्र धुमाळ निटूर जिल्हा परिषद सदस्य प्रतिनिधी, ज्ञानेश्वर पिंड,पत्रकार जावेद मुजावर, खुर्शीद पांढरे,परमेश्वर सोमवंशी, यादव काळे,वीरेंद्र जाधव,मंथन धुमाळ, केशव कांबळे, राजे लक्ष्मण, ॲड पद्माकर पेटकर,पत्रकार बालाजी कांबळे, भदरगे लक्ष्मण, नितीन शिंदाळकर, प्रभाकर राठोड, सह केळगाव,निटूर,मुगाव मसलगा या मंडळातील शेतकऱ्याच्या निवेदनावर स्वाक्षर्या आहेत.