महाराष्ट्र खाकी ( लातूर / प्रतिनिधि) – भारतातील अनेक मान्यवराचे गुरु आदरणीय श्री श्री श्री 1008 कालिदास महाराज हरियाना यांच्या हस्ते आयुर्वेदिक क्षेत्रात नव्याने सुरुवाता केलेली भिमालया आयुर्वेद प्रा.लि.या कंपनी च्या आयुर्वेद उत्पादनाचे लोकार्पण,पंढरपुर च्या विट्ठल रुक्मिणी मंदिराचे
सहअध्यक्ष ह.भ.प.गहिनीनाथ महाराज , एमएसआरडीसी चे सह व्यवस्थापकीय संचालक अनिलकुमार बळीराम गायकवाड, लातूर लोकसभेचे मा.खासदार प्रोफेसर डॉ सुनील गायकवाड, खा.सुधाकर शृंगारे, भदंत डॉ उपगुप्त महाथेरो आदी मान्यवरांच्या हस्ते भीमालयाच्या प्रॉडक्ट चा लोकार्पण
संप्पन झाला. एमएसआरडीसी चे सह व्यवस्थापकीय संचालक अनिलकुमार बळीराम गायकवाड यांच्या 60 व्या वाढदिवसानिमित्य आयुर्वेदिक औषधाच्या भीमालया आयुर्वेद कंपनी सुरू केली आहे.पहिल्या टप्यात 10 प्रोडक्ट लॉन्च केले आहे.अत्यंत उपयुक्त आणि भारत सरकारच्या आयुष मंत्रालयानी प्रमाणित केलेले सर्व प्रोडक्ट आहेत. प्रामुख्याने
भिमालया मेमरी बुश्टर सिरप,भिमालया शुगर गो सिरप, भिमालया कफ सिरप,भिमालया हेयर ऑइल, भिमालया स्टोनो सिरप,भीमालया चरम सुख कॅप्सुल,भिमालया इम्युनिटी बुष्टर,भिमालया गैस चूर्ण,भिमालया निम बाथ सोप,असे दहा प्रोडक्ट लाँच केले आहेत.हे सर्व प्रॉडक्ट लवकरच बाजारात विक्रीसाठी
उलब्ध करीत असल्याचे मनोगत डॉ सुनील बळीराम गायकवाड यांनी केले आहे. श्री श्री श्री 1008 कालिदास महाराज यांनी मा खा डॉ सुनील बळीराम गायकवाड यांनी भिमालया आयुर्वेद कंपनी सुरू केल्याबद्दल अभिनंदन करुन शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाला श्री श्री श्री कालिदास महाराज हरियाणा,ह.भ.प.गहिनीनाथ महाराज,निलंगा
पीरपाशा दर्ग्याचे दादा पीर,मा.खा.डॉ प्रोफेसर सुनील बळीराम गायकवाड,माजी खासदार रवींद्र गायकवाड,खा.सुधाकर शृंगारे, शैलेश पाटील चाकुरकर, डॉ अर्चनाताई पाटील चाकुरकर,अशोक पाटील निलंगेकर,माजी जिल्हा परिषद अध्यक्ष पंडितराव धुमाळ, डॉ अरुण डावले,विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय
महाविद्यालयाचे डीन डॉ जोशी,ऍड.व्यंकट बेद्रे,माजी महापौर सुरेश पवार,भंते पय्यानंद,अनेक राजकीय पक्षाचे पदाधिकारी,सामाजिक कार्यकर्ते,अधिकारी,हिंदू संत महात्मे, बौद्ध भिक्खु, 51 भंतेजी,ख्रीचन गुरु, मुस्लिम संत, समाजातील सर्व स्तरातील मान्यवर हजारोच्या संख्येंनी उपस्थित होते.