महाराष्ट्र खाकी (लातूर / विवेक जगताप ) – लातूर शहरातील तावरजा कॉलनीमधील इस्लामपुरा भागीत अलनासिर मजिद जवळ फुगे विकणार्या व्यक्ती जवळील नायट्रोजन गॅस सिलेंडर फुटल्याची दुर्देवी घटनेट जखमी झालेल्या लहान मुलांची आणि त्यांच्या पालकांची लातूर जिल्ह्यातील भाजपा युवा नेते अजित पाटील कव्हेकर
यांनी भेट घेतली. लातूर शहरातील अलनासिर मजिद जवळ फुगे विकणार्या व्यक्ती जवळील नायट्रोजन गॅस सिलेंडर फुटल्याची दुर्दैवी घटना घडली असून यात फुगे विकणार्या व्यक्ती चा जागीच मृत्यू झाला असुन वय वर्षे 5 ते 12 वयातील निष्पाप 11 लहान मुले गंभीर जखमी झाले आहेत. शासकीय रुग्णालय लातुर येथे त्यांच्या वर
उपचार सुरू असुन 1 मुलाची प्रकृती चिंताजनक आहे प्रसंगी शासकीय रुग्णालय प्रशासनाची लातूर जिल्ह्यातील भाजपा युवा नेते अजित पाटील कव्हेकर यांनी तातडीने भेट घेऊन विचारपूस केली व सर्वेात्परी आवश्यक ते उपचार करण्यास विनंती केली व प्रसंगी उपस्थित मुलांच्या नातेवाईकांची भेट देऊन धीर दिला व शासकीय
रुग्णालयात सर्व बालकांची भेट घेतल्यानंतर ते दृश्य मनाला वेदना देणार आहे असे मत अजित पाटील कव्हेकर यांनी वेक्त केले.