मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यातील 12 जिल्ह्यांच्या पालकमंत्र्यांची सुधारीत यादी जाहीर

महाराष्ट्र खाकी ( मुंबई / प्रतिनिधी ) – राज्यातील 12 जिल्ह्यांच्या पालकमंत्र्यांची सुधारीत यादी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज जाहीर केली आहे. या सुधारित यादीनुसार उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे पुणे जिल्ह्याचे पालकमंत्रीपद देण्यात आले आहे तर लातूर जिल्ह्यातील उदगीरचे आमदार आणि मंत्री संजय

बनसोडे यांना लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री पद मिळेल अशी अपेक्षा होती पण तसे न होता संजय बनसोडे यांना लातूर ऐवजी परभणीचे पालकमंत्री पदाची जिम्मेदारी मिळाली आहे. सुधारित 12 जिल्ह्यांच्या पालकमंत्रीपदाची जबाबदारी पुढीलप्रमाणे

पुणे – अजित पवार

अकोला – राधाकृष्ण विखे- पाटील

सोलापूर – चंद्रकांत दादा पाटील

अमरावती – चंद्रकांत दादा पाटील

भंडारा – विजयकुमार गावित

बुलढाणा – दिलीप वळसे-पाटील

कोल्हापूर – हसन मुश्रीफ

गोंदिया – धर्मरावबाबा आत्राम

बीड – धनंजय मुंडे

परभणी – संजय बनसोडे

नंदूरबार – अनिल भा. पाटील

वर्धा – सुधीर मुनगंटीवार

Recent Posts