महाराष्ट्र खाकी ( लातूर / विवेक जगताप ) – काही राजकीय कुत्र्यांच्या सांगण्यावरून माजी मंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांच्या जल साक्षरता रॅलीला विरोध करून काळे झेंडे दाखवले असा आरोप अखिल भारतीय छावा संघटनेचे अध्यक्ष नानासाहेब जवळे यांनी केला आहे. संपूर्ण लातूर जिल्ह्याला पाण्याच्या प्रश्नांबाबत
जागरूक करण्यासाठी आणि वस्तुस्थिती समजावण्यासाठी माजी मंत्री संभाजी पाटील निलंगेकर दि. 19 सप्टेंबर ते 26 सप्टेंबर 2023 या कालावधीत जिल्हाभर जल साक्षरता रॅली काढली आहे. काल दि. 22 सप्टेंबर रोजी रॅली अहमदपूर तालुक्यातील एका गावात संभाजी पाटील नीलंगेकारांना मराठा क्रांती मोर्चाच्या
कार्यकर्त्यांनी काळे झेंडे दाखवून विरोध केल्याची घटना घडली या नंतर आज दि. 23 सप्टेंबर रोजी अखिल भारतीय छावा संघटनेचे अध्यक्ष नानासाहेब जवळे यांनी पत्रकार परिषद घेऊन या घटनेचा तीव्र शब्दात निषेध केला, नानासाहेब जवळे बोलताना म्हणाले की मराठवाड्याच्या पाण्यासाठी एक मराठा आमदार पुढाकार
घेऊन चांगले कार्य करत आहे, सतेत्त असताना सुद्धा हे धाडसी पाऊल त्यांनी उचलून समाजात पाण्याबद्दल जागरूकता करत आहे मी त्यांचे अभिनंदन करतो पण काही राजकीय कुत्र्यांच्या सांगण्यावरून काही लोक संभाजी पाटील निलंगेकर यांना काळे झेंडे दाखवून विरोध करत आहेत याचा मी जाहीर निषेध करतो.