महाराष्ट्र खाकी (लातूर / विवेक जगताप ) – ‘कलंक’ या शब्दावरून महाराष्ट्राचं राजकारण ढवळून निघालं आहे. शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे काल नागपूरमध्ये होते. तिथे त्यांनी पक्षाचा कार्यकर्ता मेळावा घेतला. या मेळाव्यात उद्धव ठाकरेंनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यांवर निशाणा साधला.
फडणवीस यांचा थेट ‘कलंक’ असा उल्लेख उद्धव ठाकरे यांनी केला. त्यांच्या या वक्तव्यावर प्रतिक्रिया उमटत आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे विश्वासू असलेले औशा चे आमदार अभिमन्यू पवार यांनी ट्विट करत माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. आमदार अभिमन्यू आपल्या ट्विट मध्ये उद्धव ठाकरे
यांच्यावर मानसिक संतुलन ढळत आहे, दिवसागणिक भाषेचा स्तर घसरतो आहे, सोज्वळपणाचा मुखवटा बाजूला सरुन खरा चेहरा दिसतो आहे. असे म्हणत निषेध नोंदवला आहे.