महाराष्ट्र खाकी ( लातूर / विवेक जगताप ) – RBI ने शुक्रवारी (19 मे) संध्याकाळी चलनातून 2000 रुपयांची नोट बंद केल्याची घोषणा केली. तेव्हापासून राजकारण तापले आहे. याबाबत काँग्रेस आणि विरोधकांनी केंद्रातील मोदी सरकारवर टीका केल्या जात आहेत . 2000 रुपयांची नोट बंद केल्याच्या घोषणेनंतर लातूर शहर
महानगर पालिकेचे माजी महापौर विक्रांत गोजमगुंडे यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत आपली प्रतिक्रिया दिली आहे, सध्या गोजमगुंडे यांची पोस्ट चर्चेत आहे. आपल्या पोस्ट मध्ये विक्रांत गोजमगुंडे असे म्हणाले आहेत. 2000 रुपयांच्या नोटेलाही तिलांजली??? नुकतेच रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या वतीने 2000 रुपयांची नोट बदलून
घेण्याचं जाहीर करण्यात आले असल्याची बातमी पुढे येत आहे. 30 सप्टेंबर 2023 पर्यंत नोटा बदलून घेण्याची मुभा असल्याचेही नमूद करण्यात आले आहे. हा निर्णय स्वागतार्ह असला तरी नोटबंदी प्रमाणे हा देखील एक फसणारा निर्णय ठरू नये ही अपेक्षा.