महाराष्ट्र खाकी (लातूर / प्रतिनिधी) – माजी आ. शिवाजीराव पाटील कव्हेकर साहेब लातूर बाजार समितीचे सभापती असताना शेतकरी, व्यापारी, हमाल, मापाडी यांना न्याय देण्याचे काम केले आहे. लातूरसाठी 135 कोटीची पाणीपुरवठा योजना राबविण्याचे काम केले. तसेच शेतकर्यांच्या मुलासाठी वसतिगृह, शेकडो
भूकंपग्रस्तांना अनुदान मिळवून देणे तसेच आत्महत्याग्रस्त दीडशे कुटुंबियांना 10 ते 15 हजाराची मदत, एम. एन. एस.बँकेच्या माध्यमातून 10 हजार बचत गटाच्या महिलांना विनातारण लाखाचे कर्ज देऊन महिलांना उद्योगी बनविण्याचे काम केलेले आहे. याबरोबरच कडबा बाजार, जनावरांचा बाजार, हमाल, मापाडी भवन उभारून
शेतकरी, व्यापारी, हमाल, मापाड्यांना न्याय देण्याचे काम माजी आ. शिवाजीराव पाटील कव्हेकर साहेबांनी केले. त्यानंतर अनेक सभापती झाले. पंरतु त्यांची साधी ओळखही शेतकरी, व्यापारी, हमाल, मापाडीमध्ये निर्माण झालेली नाही. आजही लातूर बाजार सभापती कोण? म्हटले तर माजी आ.शिवाजीराव पाटील कव्हेकर साहेबांचे
नाव समोर येते. त्यामुळे लातूर बाजार समितीची खरी
ओळख ही कव्हेकर साहेबांमुळेच आहे. असे प्रतिपादन ज्येष्ठ कवी नरसिंग इंगळे यांनी राज्याचे माजी कामगार कल्याण मंत्री आ.संभाजीराव पाटील निलंगेकर यांच्या मार्गदर्शनाखालील छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी, व्यापारी, हमाल, गाडीवान परिवर्तन पॅनलच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ हरंगुळ (बु) व हरंगुळ (खु) येथे आयोजित प्रचारसभेत केले.