गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करताना तोंड सांभाळून बोला उद्धव ठाकरेजी – भाजपा प्रवक्त्या प्रेरणा होनराव

महाराष्ट्र खाकी (लातूर / विवेक जगताप ) – उद्धव ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या बद्दल वापरलेल्या फडतुस या शब्दांमुळे राज्यातील वातावरण चांगलेच तापले आहे. या वक्तव्यचा निषेध महाराष्ट्र भाजपा प्रवक्त्या प्रेरणा होनराव यांनी उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra

Fadnavis ) यांच्यावर टीका करताना तोंड सांभाळून बोला उद्धव ठाकरेजी! अडीच वर्षांत तुमची फडतूस कामगिरी महाराष्ट्रातील जनतेनं पाहिली आहे. पालघर साधू हत्याकांड ते 100 कोटी वसुली प्रकरणात तुम्ही काय केलं हे जनता विसरली नाही. या शब्दात चांगलाच समाचार घेतला. राज्यात उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे

यांच्या गटातील वाद दिवसेंदिवस वाढत चालला आहे. सोमवारी (दि. 3) रोजी ठाण्यात ठाकरे आणि शिंदे गटातील महिलांमध्ये तुफान राडा झाला. त्यात शिंदे गटाच्या महिलांनी ठाकरे गटाच्या कार्यकर्त्या रोशनी शिंदे यांच्यावर हल्ला केला. त्यात त्या गंभीर जखमी झाल्या त्यांनंतर उद्धव ठाकरे यांनी राज्यातील कायदा –

सुव्यवस्थेवरुन उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जहरी टीका करत लाचार, लाळघोटेपणा करणारा फडतुस गृहमंत्री देवेंद्र फडणवीस अशी टीका केली. उद्धव ठाकरे यांनी वापरलेल्या फडतुस या शब्दांमुळे राज्यातील वातावरण चांगलेच तापले आहे. राज्यभारत भाजप नेते प्रतिक्रिया देत आहेत. महाराष्ट्र

भाजपा च्या प्रवक्त्या आणि लातूर जिल्ह्यातील भाजपच्या आक्रमक, अभ्यासू महिला नेत्या प्रेरणा होनराव यांनी उद्धव ठाकरे यांच्या वक्तव्याचा चांगलाच समाचार घेतला आहे.

Recent Posts