महाराष्ट्र खाकी (लातूर / विवेक जगताप) – IPS अधिकारी सोमय मुंडे यांच्या गडचिरोलीत नक्षलवाद्या विरुद्ध केलेल्या कारवायांचा जलवा पूर्ण राज्यासह देशाने पहिला आहे. समाजातील गुन्हेगारी कशी नष्ट करायची आणि गुन्हेगारांना कुठे ठेचायचे IPS सोमय मुंडे यांना चांगलेच माहिती आहे. जसे गुन्हेगार तशी कारवाई या नियमाला
धरून लातूर पोलीस अधीक्षक सोमय मुंडे यांनी लातूर जिल्ह्यातील उदगीर ग्रामीण पोलिस ठाण्याच्या हद्दीत वारंवार गुन्हे करणाऱ्या व टोळीने राहणाऱ्या सराईत गुन्हेगारांविरुद्ध हद्दपारीची आदेश काढले आहेत . आगामी सण उत्सवाच्या अनुषंगाने लातूर जिल्ह्यात शांतता अबाधित राहावी सराईत गुन्हेगाराकडून कोणत्याही
प्रकारचे गैरकायदेशीर कृत्य घडू नये याकरिता उदगीर ग्रामीण पोलीस स्टेशनच्या हद्दीत वारंवार गंभीर स्वरूपाचे गुन्हे करून नागरिकांमध्ये दहशत निर्माण करणाऱ्या टोळी मधील टोळीप्रमुख ओम प्रकाश तुळशीराम याळे, वय 26 वर्ष आणि टोळीतील सदस्य, ओमकार योगीराज बिरादार, वय 24 वर्ष, महादेव बाबुराव हसनाबादे, वय 22 वर्ष, सर्व
राहणार पंढरपूर ,तालुका देवणी जिल्हा लातूर. या गुन्हेगारांना एक वर्षासाठी हद्दपार करण्यात आले आहेत. आगामी काळात साजरे होणारे सण-उत्सव व येणाऱ्या काळात होऊ घातलेल्या महानगरपालिका व जिल्हा परिषद निवडणुकांच्या अनुषंगाने त्यांच्या विरुद्ध महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 चे कलम 55 प्रमाणे कार्यवाही
करून दिनांक 31/03/2023 रोजी पोलीस अधीक्षक सोमय मुंडे यांनी हद्दपारिचे आदेश पारित करून 31/03/2023 तारखेपासून सर्व सराईत गुन्हेगार हे लातूर, नांदेड , धाराशिव ( उस्मानाबाद ) व परभणी या चार जिल्ह्यातून एक वर्षासाठी हद्दपार करण्यात आले आहेत. हद्दपार केलेल्या सर्व गुन्हेगारांना उदगीर ग्रामीण
पोलिसांनी हद्दपार क्षेत्राचे बाहेर नेऊन सोडण्याची कार्यवाही सुरू आहे. या कारवाईच्या माध्यमातून गुन्हेगारी कृत्य करणाऱ्या सराईत गुन्हेगार, उपद्रवी लोकांवर जरब बसून तीन सराईत गुन्हेगारांची टोळी जिल्ह्यातून हद्दपार केल्यामुळे इतर गुन्हेगारी कृत्य करणाऱ्यां गुन्हेगारांना चांगलाच दणका बसला आहे हे मात्र निश्चित आहे. पोलीस अधीक्षक सोमय मुंडे यांच्या या आदेशाचे जिल्हाभरात कौतुक होत आहे.