महाराष्ट्र खाकी (लातूर / हरिराम कुलकर्णी )– महाराष्ट्राच्या राजकारणात कर्तुत्वान दृष्टी असलेले तरुण चेहरा स्वच्छ प्रतिमेचे युवक नेतृत्व म्हणून राज्याचे माजी वैद्यकीय व सांस्कृतिक कार्यमंत्री लातूरचे आमदार अमित विलासराव देशमुख यांचे नाव राज्यभर चर्चिले जात आहे एक विकसनशील, विकासाची दृष्टी ठेवून कार्य करणारे सर्वांचे
लक्ष वेधून घेणारे हे काँग्रेसचे नेतृत्व म्हणून साऱ्या राज्याचे लक्ष वेधले जात आहे त्याला कारण सुद्धा आहे तसेच आहे राज्याचे माजी मुख्यमंत्री राहीलेले विकासाचे स्वप्न साकारून प्रत्यक्षात आणण्यासाठी प्रयत्नशील असणारे लोकनेते विलासराव देशमुख यांचे ते चिरंजीव तर त्यांची जशी कामाची पद्धत छबी आहे त्याच धर्तीवर ते लोकांच्या
विकासाच्या मार्गावर घेवुन जाण्यासाठी विविध विषयवार अभ्यास करणारे आमदार अमित देशमुख यांच्या नावाचा उल्लेख नेहमी होत असून सध्याच्या परिस्थितीत काँग्रेसमध्ये एक चांगला चेहरा स्वच्छ प्रतिमा असलेले नेतृत्व म्हणून उदयाला येवू शकेल असे आम्हाला वाटते उत्कृष्ट मांडणी, वेगवेगळ्या विषयांवर दांडगा अभ्यास
लोकांत जावून त्यांचें प्रश्न समजून घेवुन त्याला न्याय कसा देता येईल राज्यांत दोन वेळा मंत्रिपद भोगलेले अनुभवी व्यक्ती म्हणून भविष्यात त्यांना राज्यस्तरावर कार्य करण्याची भूमिका घ्यावी लागेल असे चित्र काँग्रेसमध्ये दिसत आहेत. अमीत देशमुख यांच्या विकास कार्याची झलक राज्यांनी बघितली – राज्याचे वैधकीय शिक्षण मंत्री
असताना कोविड-19 च्या काळात त्यांनी केलेल्या कार्याची नोंद घ्यावी असे काम त्यानी केले त्यात मेडिकल साठी 70/30 चा कोठा रद्द केला हा निर्णय घेतल्याने कुठल्याही मेडिकलच्या मुलांना प्रवेश मिळत आहे हा निर्णय घेताना त्यांनी जे विधानसभेत अभ्यासपूर्वक मुद्दे मांडले सभागृहात दोन्ही बाजूने बिनशर्त आमदारांनी
पाठिंबा दिला यामुळें राज्यांतील लाखो विद्यार्थ्याना फायदा झाला आहे हे लोक विसरू शकत नाही दुसरा निर्णय राज्यांतील अनेक जिल्ह्यांत मेडिकल कॉलेज सुरू करण्यासाठी पुढाकार घेवून केंद्र शासन राज्यशासन यांच्याकडून परवानगी मंजुरी घेतली त्यात अनेक जिल्ह्यांत मेडिकल कॉलेज सुरू झाले आहेत तर अनेक जिल्ह्यांत
बांधकाम पूर्ण झाले आहे असे काही चांगले निर्णय त्यांच्या कार्यकाळात झाले आहेत. कोविड काळात पायाला भिंगरी लावून राज्यभर फिरले – देशात जगभरात सगळीकडे कोरोणाच्या महामारी ने थैमान घातले असताना दुसरीकडे तत्कालीन वैद्यकीय शिक्षण मंत्री असताना आमदार अमित विलासराव देशमुख अक्षरशः डोळ्यात तेल घालून राज्यांत
फिरले लोकांना धीर दिला लोकांना औषध उपचार मेडीसिन ऊपलब्ध करून दिले संकटमोचक म्हणून राज्यांत आजही दोन तत्कालीन आरोग्य मंत्री आमदार राजेश टोपे व वैधकीय शिक्षण मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख यांच्या कार्याचा राज्यात ठळकपणे समोर नाव पुढें येते संकटकाळात दिवस रात्र लोकांच्या
कार्यासाठी कटीबद्ध असणारे लातूरचे आमदार अमित विलासराव देशमुख यांचा कुटुंबात समाजकारण राजकारण यांचा खुप मोठा वारसा आहे राज्याचे माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांचे ते चिरंजीव तर माजी मंत्री सहकार महर्षी दिलीपराव देशमुख यांचे ते पुतणे तर लातूर ग्रामीणचे आमदार धीरज विलासराव देशमुख यांचे
ते भाऊ आहेत राज्याचे माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख यांचा आज वाढदिवस लातूरच्या समाजकारणात राजकारणात सक्रिय असणाऱ्या देशमुख कुटुंबातील एक स्वच्छ प्रतिमेचे नेते म्हणून राज्यांत नाव चर्चिले जात आहे निश्चित त्यांना संधी राज्यस्तरावर कार्य करण्याची मिळेल त्यासाठी त्यांना आजच्या वाढदिवसाच्या निमित्ताने हार्दिक शुभेछा देतो येणाऱ्या काळात आपल्या हातून राज्याची सेवा करण्याची संधी मिळावी अशी परमेश्र्वराकडे प्रार्थना करतोय .