रंगपंचमी निमित्त लातूर पोलीस सज्य, महिलांना विशेष आवाहन छेडछाड सहन करू नका

महाराष्ट्र खाकी ( लातूर / विवेक जगताप ) – करोना काळानंतर शंभर टक्के पूर्ण मुक्त रंगपंचमी यंदा साजरी होत आहे. रंगपंचमी होळीनंतर सहा दिवसांनी आहे. लातूर जिल्ह्यात रंगपंचमी मोठ्या उत्साहात साजरी केली जाते, लातूर जिल्ह्यात विशेषतः लातूर शहरात विवीध हॉटेल चालकांनी रंगपंचमी उत्सवाचे (पार्टी) आयोजन केले आहे.

रंगपंचमीचा बेरंग होऊ नये म्हणून लातूर पोलीस अधीक्षक सोमय मुंडे यांच्या मार्गदर्शनात सर्वत्र चोख बंदोबस्त लावण्यात आलेला आहे. सर्व पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक स्वतः आपाल्या क्षेत्रात सतर्क असून, महिला पोलिसांचाही बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. याशिवाय मद्यपी वाहन चालक आणि धूम स्टाईलने दुचाकी

पळवणाऱ्यांवरही नजर ठेवण्यात येत आहे. रंगपंचमी सणाच्या नावाखाली महिलांना लक्ष करणारे कोणतेही उपद्रवी वर्तन किंवा गुंडगिरी हुल्लळबाजी, पाठलाग, छेडछाड सहन करू नका. आपल्याला कुठलाही अनुचित प्रकार घडताना आढळला तर त्वरित दामिनी पथकाशी संपर्क दामिनी पथक हेल्पलाईन 112 किंवा

8830115409 या नंबरशी साधा लातूर पोलीस दल आपल्या पाठीशी आहे असा विश्वास आणि लातूर पोलिसांतर्फे आवाहन करण्यात आले आहे.

Recent Posts