Latur police news गांधी चौक पोलीस स्टेशन हद्दीत LCB कडून 2 लाख 16 हजार रुपयांचा गुटखा जप्त

महाराष्ट्र खाकी ( लातूर / विवेक जगताप ) – पोलीस अधीक्षक सोमय मुंडे यांनी जिल्ह्यातील अवैध धंद्यावर कठोर कारवाई करण्याचे निर्देशित केले आहे. त्या अनुषंगाने जिल्हा पोलीस दलातील विवीध पथके, विशेषतः LCB कडून आणि जिल्ह्यातील सर्व पोलीस

स्टेशन आपल्या हद्दीतील अवैध धंद्याची माहीती काडून कठोर कारवाई करत आहेत. अशीच एक कारवाई अपर पोलीस अधीक्षक डॉ.अजय देवरे, उपविभागीय पोलीस अधिकारी लातूर शहर जितेंद्र जगदाळे यांच्या मार्गदर्शनात (LCB) स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक गजानन

भातलवंडे यांचे नेतृत्वात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी व अंमलदारांच्या पथकाला लातूर शहरातील गंजगोलाई परिसरातील अण्णाभाऊ साठे चौकात असलेल्या कावळे प्रोव्हिजन अँड किराणा दुकानात विठ्ठल माणिकराव कावळे हा प्रतिबंधित गुटका व सुगंधित

तंबाखूची चोरटी विक्री करीत आहे. साठवणूक करीत आहे. अशी खात्रीशीर बातमी मिळाल्याने या माहितीची शहानिशा करून (LCB ) स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस अधिकारी व अमलदारांच्या पथकाने दिनांक 14/02/ 2023 रोजी दुपारी 5 वाजण्याच्या अण्णाभाऊ साठे

चौकातील कावळे प्रोव्हिजन अँड किराणा दुकानात छापा मारून 2 लाख 16 हजार 680 रुपयांचा प्रतिबंधित गुटका व सुगंधित पान मसाला तंबाखू जप्त करून गांधी चौक पोलीस स्टेशन येथे नाईक पोलीस कॉन्स्टेबल नवनाथ हाजबे यांच्या तक्रारीवरून प्रतिबंधित गुटका व सुगंधित

तंबाखूची अवैधरित्या साठवणूक करून विक्री व्यवसाय करणारा कावळे प्रोव्हिजन अँड किराणा दुकानाचा मालक विठ्ठल कावळे याच्या विरुद्ध गांधी चौक पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजिस्टर क्रमांक 75/ 2023, कलम 188, 272, 273,328 भा.द.वि. याप्रमाणे गुन्हा दाखल केला आणि

अटक केली. गुन्ह्याचा पुढील तपास गांधी चौक पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक कवाळे करीत आहेत. ही कामगिरी (latur LCB) स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक गजानन भातलवंडे, यांचे नेतृत्वात सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन द्रोणाचार्य, नवनाथ हसबे , मोहन सुरवसे, नितीन कठारे, नकुल पाटील यांनी पार पाडली.

Recent Posts