महाराष्ट्र खाकी ( लातूर / विवेक जगताप ) – राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा आमदार जितेंद्र आव्हाड यांनी महाराष्ट्राचे अराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल वादग्रस्त वक्तव्य केले त्यामुळे भाजपा कडून राज्यात वेगवेगळ्या शहरात आंदोलन आणि निषेध करत आहेत. आज लातूर शहरामध्ये आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधात राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष
चंद्रशेखर बावणकुळे, भारतीय जनता युवा मोर्चा महाराष्ट्र प्रभारी विक्रांतदादा पाटील, भाजपा युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष राहुलजी लोणीकर, लातूरचे माजी पालकमंत्री संभाजीराव पाटील निलंगेकर, भाजपाचे शहर जिल्हाध्यक्ष गुरूनाथ मगे यांच्या मार्गदर्शनाखाली व भाजपा युवा मोर्चाचे शहर जिल्हाध्यक्ष अजितसिंह पाटील कव्हेकर यांच्या सुचनेनुसार लातूर भाजपा युवा मोर्चा शहर
जिल्ह्याच्यावतीने छत्रपती शाहू महाराज चौकामध्ये त्यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन करून तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला. यावेळी भाजपा युवा मोर्चाचे सरचिटणीस अॅड.गणेश गोजमगुंडे, सागर घोडके, विद्यार्थी आघाडीचे जिल्हाध्यक्ष राजेश पवार, राहुल भूतडा, सुनिल राठी, पांडुरंग बोडके, आकाश बजाज, राजू सोनवणे, प्रियंका जोगदंड, महादेव पिटले, योगेश गंगणे, ईश्वर कांबळे,
चैतन्य फिस्के, मंदार अराध्ये, निरज पाटील, मल्हारी भोसले, अक्षय येचवाड यांच्यासह भाजयुमोचे पदाधिकारी व मोठ्या संख्येने उपस्थित होते.