महाराष्ट्र खाकी (लातूर / विवेक जगताप ) – लातूर जिल्हा पोलीस अधीक्षक सोमय मुंडे यांनी अवैध शस्त्रांचे संबंधाने माहिती काढून त्यावर कारवाई करन्याचे निर्देशित केले होते. त्या अनुषंगाने अपर पोलीस अधीक्षक डॉ.अजय देवरे, यांच्या मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे (LCB) पोलीस निरीक्षक गजानन भातलवंडे यांच्या नेतृत्वात पथक तयार करुन अवैध शस्त्र बाळगणाऱ्या इसमांच्या
विरुद्ध कडक कार्यवाही करण्यात येत आहे. या कार्यवाही अंतर्गत माहिती काढत असताना स्थानिक गुन्हे शाखेच्या (LCB) पथकाला दि. 17/01/2023 रोजी गोपनीय माहिती मिळाली की, शिवाजीनगर पोलीस स्टेशन हद्दीत छत्रपती शिवाजी महाराज चौक ते राजीव गांधी चौक जाणारे रोडवर दोघेजण तलवार सारखे घातक शस्त्र घेऊन ते शर्टच्या आतील बाजूस लपवून फिरत आहेत. अशी
माहिती मिळाल्याने LCB पथकाने तात्काळ त्या ठिकाणी जाऊन शर्टच्या आतील बाजूस तलवार लपवून फिरणारा युवक श्रीकांत उर्फ चिलकारी गुराप्पा पवार, वय 20 वर्ष, राहणार शंकरआप्पातोट तालुका कल्याणदुर्ग, जिल्हा अनंतपुर, राज्य आंध्रप्रदेश. सोबत एक विधी संघर्ष बालक याला ताब्यात घेउन त्यांच्याकडे एक लोखंडी तलवार,लोखंडी चाकू, कातर, कानस व एक बॅटरी मिळून
आली. सदरचे घातक शस्त्र व बॅटरी, कानस जप्त करण्यात आली असून आरोपी युवक श्रीकांत उर्फ चिलकारी गुराप्पा पवार याचेवर शिवाजीनगर पोलीस स्टेशन येथे कलम 4, 25 भारतीय हत्यार कायद्याप्रमाणे गुन्हा दाखल करण्यास आलेला आहे. गुन्ह्याचा पुढील तपास शिवाजीनगर पोलीस करीत आहेत. हि कामगिरी वरिष्ठांच्या मार्गदर्शनात व स्थानिक गुन्हे शाखेचे (LCB) पोलीस निरीक्षक गजानन
भातलवंडे यांच्या नेतृत्वात पोलीस अमलदार रामहरी भोसले, राजेंद्र टेकाळे, संजय भोसले अंगद कोतवाड, बंटी गायकवाड ,राम गवारे, प्रकाश भोसले, दीनानाथ देवकते ,प्रमोद तरडे ,नितीन कठारे ,जमीर शेख यांनी केली आहे.