Latur police news पोलीस अधीक्षक सोमय मुंडे यांच्या मार्गदर्शनात LCB ने गाडी चोरीचे पाच गुन्हे केले उघड

महाराष्ट्र खाकी ( लातूर / विवेक जगताप ) – लातूर (LCB) स्थानिक गुन्हे शाखाची कामगिरी  जिल्ह्यातील मोटारसायकल चोरीचे 5 गुन्हे उघडकीस आणून चोरीस गेलेल्या 5 मोटारसायकली  जप्त केल्या आणि 1 लाख 50 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. लातूर पोलीस अधीक्षक सोमय मुंडे यांचे आदेशान्वये अपर पोलीस अधीक्षक डॉ .अजय देवरे, उपविभागीय पोलिस अधिकारी

लातूर शहर जितेंद्र जगदाळे यांचे मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा गजानन  भातलवंडे यांचे नेतृत्वात लातूर जिल्ह्यातील वेगवेगळ्या पोलीस स्टेशन मध्ये (मालाविषयक) मोटारसायकल चोरीचे गुन्हे उघडकीस आणण्याकरिता विशेष पथके तयार करून पथकातील पोलीस अधिकारी व अंमलदार यांना सूचना व मार्गदर्शन करण्यात आले होते. पोलीस स्टेशनला दाखल

असलेल्या विशेषता मोटारसायकल चोरीचे गुन्हे उघड करण्याचे प्रयत्न सुरू होते .त्या अनुषंगाने LCB पथके माहितीचे संकलन करीत असताना, दि. 08/ 01/2023 रोजी (LCB) स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला माहिती मिळाली , नवीन रेणापूर नाका, रेल्वे स्टेशन परिसरात चोरीच्या मोटारसायकली खरेदी व विक्रीचा व्यवहार होणार आहे. अशी खात्रीशीर बातमी मिळाल्याने LCB पथकाने

रेल्वे स्टेशन परिसरात सापळा लावून चोरीच्या मोटरसायकल खरेदी-विक्रीचा व्यवहार करण्यासाठी रेल्वे स्टेशन परिसरात फिरणारा बातमी मधील मुकेश वामन गायकवाड वय 28 वर्ष राहणार हंचनाळ तालुका निलंगा याला ताब्यात घेउन त्यांच्याकडे पोलिसांनी आणखीन सखोल विचारपूस केली असता त्याने सांगितले की, लातूर शहरातील विविध ठिकाणाहून तसेच जिल्ह्या बाहेरून

मोटारसायकली चोरी करून एकत्र लपवून ठेवतात व एकदाच विकतात असे सांगितले. पोलीस चौकशी मध्ये त्यांच्या कडून एकूण पाच मोटारसायकली ज्याची किंमत 1 लाख 50 हजार रुपयांचा मुद्देमाल  जप्त करण्यात आला, जप्त केलेल्या मोटारसायकली संदर्भात लातूर जिल्ह्यात 4 गुन्हे, पुणे जिल्ह्यात 1 गुन्हा दाखल असल्याचे माहितीमधून दिसून आली 1) MIDC पोलीस स्टेशन गुन्हा

रजिस्टर क्रमांक 421/2022 कलम 379 भादवी. 2)MIDC पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर क्रमांक 498/2022 कलम 379 भादवी. 3) MIDC पोलीस स्टेशन, गुन्हा रजिस्टर क्रमांक 681/2022 कलम 379 भादवी. 4) गांधी चौक पोलीस स्टेशन, गुन्हा रजिस्टर क्रमांक 18/2022 कलम 379 भादवी. 5) हडपसर पोलीस स्टेशन, गुन्हा रजिस्टर क्रमांक 1607/22 कलम

379 भादवी या प्रमाणे गुन्हे दाखल असून सदर गुन्ह्यातील मोटरसायकली जप्त करण्यात आलेले आहेत तसेच पुढील कायदेशीर कारवाई करिता नमूद जप्त मुद्देमाल व आरोपी MIDC पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले आहे.  कामगिरी वरिष्ठांचे मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक गजानन भातलवंडे यांचे मार्गदर्शनात सपोनी सचिन द्रोणाचार्य, पोलीस अमलदार अंगद कोतवाड, माधव बिल्लापट्टे, राजू मस्के, राजेश कंचे, जमीर शेख, नितीन कठारे, प्रदीप चोपणे यांनी पार पाडली.

Recent Posts