लातूर DCC बँक अध्यक्ष आ. धिरज देशमुख यांनी RBI च्या नियमांचा भंग केल्यामुळे तात्काळ बडतर्फ करावे – मा.आ.शिवाजीराव पाटील कव्हेकर

महाराष्ट्र खाकी ( लातूर / विवेक जगताप ) – लातूर जिल्ह्याच्या विकासात सहकार क्षेत्राचे खूप मोठे योगदान आहे. या सहकार क्षेत्रात जिल्ह्यातील कव्हेकर आणि देशमुख परिवाराचे उल्लेखनीय कामगिरी राहिली आहे. कव्हेकरांनी सहकार क्षेत्रात घडणाऱ्या चुकीच्या गोष्टीबद्दल वेळोवेळी प्रश्न उपस्तित करून अन्यायाविरुद्ध आवाज बुलंद करून न्याय मिळवण्याचा प्रयत्न केला आहे. लातूर

जिल्हा बँकेचे अध्यक्ष आमदार धिरज देशमुख यांना बडतर्फ करण्याची मागणी मा. आमदार शिवाजीराव पाटील कव्हेकर यांनी रिजर्व बँक ऑफ इंडिया (RBI) कडे केली आहे. रिजर्व बँक ऑफ इंडियाच्या (RBI) परिपत्रकानुसार दि.5 फेब्रूवारी 2021 द्वारे कोणत्याही बँकेचे संचालक, अध्यक्षांनी आपले नातेवाईक अथवा त्यांच्या फर्मला कर्ज अथवा अ‍ॅडव्हांन्सेस देवू नये अशा

प्रकारचे आदेश दिलेले आहेत. असे असताना लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष आ.धिरज देशमुख यांनी त्यांचे बंधू अभिनेता रितेश देशमुख व त्यांच्या पत्नी जेनेलिया रितेश देशमुख यांच्या देश अ‍ॅग्रो प्रायव्हेट लि.कंपनी मुंबई जी 23 मार्च 2021 मध्ये रजिस्टर्ड झालेल्या कंपनीला (Dcc bank latur ) डी.सी.सी.बँक लातूर यांनी 5 ऑक्टोबर 2021 रोजी 61.00 कोटी रूपये

व 25 जुलै 2022 रोजी 55.00 कोटी असे एकूण 116 कोटी रूपये मा.रिजर्व बँक ऑफ इंडिया बँकेच्या (RBI) परिपत्रकाचं उल्‍लंघन करून बेकायदेशीरपणे वाटप केले आहे. त्यामुळे लातूर जिल्हा बँकेचे अध्यक्ष आ. धिरज देशमुख यांना बडतर्फ करावे अशी मागणी रिजर्व बँक ऑफ इंडिया (RBI) यांच्याकडे पुराव्यासहीत लेखी स्वरूपात केली असल्याची माहिती मा.आ.शिवाजीराव पाटील कव्हेकर यांनी दिली.

Recent Posts