जनसामान्यांची दिवाळी गोड करणारा शिंदे फडणवीस सरकारचा संवेदनशील निर्णय – प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे

महाराष्ट्र खाकी ( मुंबई / प्रतिनिधी ) – दिवाळीसाठी राज्यातील सात कोटी रेशनकार्ड धारकांना अवघ्या शंभर रुपयात प्रत्येकी एक किलो रवा, चणाडाळ, साखर आणि तेलाचे पॅकेज देण्याचा महत्त्वाचा निर्णय घेतल्याबद्दल आपण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजपा – शिवसेना युती सरकारचे अभिनंदन करतो. या संवेदनशील निर्णयामुळे सर्वसामान्य

माणसाची दिवाळी गोड होईल, अशी प्रतिक्रिया भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी मंगळवारी व्यक्त केली.प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, कोरोनाच्या संकटातून आपण सर्वजण बाहेर पडत असून समाजात नवा उत्साह निर्माण झाला आहे. भाजपा – शिवसेना युती सरकारने निर्बध उठविल्यामुळे

दहीहंडी, गणेशोत्सव आणि नवरात्री हे सण दोन वर्षांनी उत्साहात साजरे झाले. आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निर्णयामुळे दिवाळीही उत्साहात साजरी होणार आहे. हे सरकार सर्वसामान्य माणसाला न्याय देणारे सरकार आहे.

Recent Posts