महाराष्ट्र खाकी ( लातूर / विवेक जगताप ) – राजकारणात नेते मंडळी एकमेकांच्या कपड्याची, गाडीची आणि कधीकधी कामाची कॉपी करत असतात पण एखाद्या नेत्याने किंवा आमदाराने एखाद्या गोष्टीबद्दल केलेल्या पोस्टची शब्दनं शब्द कॉपी करणे म्हणजे हे थोडे ज्यास्त होईल! राज्याच्या आणि लातूरच्या राजकारणात देशमुख परिवाराचे खूप मोठे योगदान आहे. विलासराव देशमुख
यांच्या राजकारणाची, लोकसेवेची, कार्य करण्याची पद्दत कॉपी करून अनेक नेते मोठे झाले आणि होत आहेत. नंतर अमित देशमुख यांच्या कार्यपाद्दतीची कॉपी करत आहेत. लॉकडाउणच्या काळात अमित देशमुख यांच्या कार्याचचे श्रेय भाजपा नेत्यांनी घेण्याचा प्रयत्न केला. आता तर लातूर भाजपा जिल्हाअध्यक्ष आमदार रमेश अप्पा कराड यांनी तर चक्क आमदार धिरज देशमुख यांची कालच्या
पोळा पूजनाची सोशल मीडियावर टाकलेली पोस्टच रमेशअप्पा कराड यांनी कॉपी केली आहे. असे लातूर काँग्रेस सोशल मीडिया प्रमुख प्रवीण सूर्यवंशी यांनी उघड केले. या पोस्ट मध्ये दोन्ही आमदारांच्या पोस्ट टाकल्या आहेत. त्या दोन्ही पोस्टच्या टाईम नुसार आमदार धिरज देशमुख यांची पोस्ट आधी केल्याचे दिसत आहे. काँग्रेसचे कार्यकर्ते या कॉपी प्रकरणावर वेगवेगळ्या कमेंट करत आहे. आमदार रमेशअप्पा कराड यांनी आमदार धिरज देशमुख यांच्या कार्याची, लोकसेवेची आणि पोस्टची कॉपी करत आहेत असे लोक मजेशीर चर्चा करत आहेत!