महाराष्ट्र

श्री व्येंकटेश चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने वृृक्षारोपण व वृृक्ष वाटप संपन्न..

महाराष्ट्र खाकी ( निलंगा / प्रशांत साळुंके ) – निलंगा तालुक्यातील अंबुलगा ( मेन ) येथे श्री व्यंकटेश चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने वृृक्षारोपण व वृृक्ष वाटप कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. या कार्यक्रमाच्या प्रसंगी उपस्थितांनी आपल्या शेताच्या बांधावर सोयीनुसार वृक्षाची लागवड नित्यनियमाने करण्यात यावे तसेच चिंच, करंज, साग, सिताफल, आवळा अशा विविध जातींच्या झाडांचे

500 वृृृक्ष वाटप करण्यात आले प्रतिवर्षा प्रमाणे याही चौथ्या वर्षातील हा कार्यक्रम घेण्यात आला श्री व्यंकटेश चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने सर्वांनी वृृृृक्षारोपण करून संगोपन करणे आवश्यक असल्याचे सांगण्यात आले आहे. याप्रसंगी निलंगा वनविभागाचे अधिकारी भडगणे, व्यंकटेश चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष अॅड.तिरूपती शिंदे, पञकार परमेश्वर शिंदे, ह.भ.प.नेताजी महाराज शिंदे,

मेघराज तोंडवळे, विकास पाटील, पंकज शिंदे, संजय खराडे, चंद्रकांत शिंदे, प्रविण शिंदे, बालाजी पाटील, अनुरथ माने, गयबी शेख, हरिभाऊ शिंदे, सदाशिष शिंदे, जालिंदर सुरवसे, दिलीप शिंदे, भानुदास शिंदे मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.

Most Popular

To Top