लातूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने आजादी गौरव पदयात्रेचे आयोजन

महाराष्ट्र खाकी ( लातूर ) – स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या निमित्ताने लातूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीची आजादी गौरव पदयात्रा 9 ते 14 ऑगस्ट पर्यंत शहरातील विविध भागात जाणार असुन त्यासाठी जय्यत तयारी सुरू केली असून स्वातंत्र्याला 75 वर्ष होत असताना स्वातंत्र्याचा गौरवशाली इतिहास लोकांसमोर मांडण्यासाठी आणि स्वातंत्र्य चळवळीतील स्वातंत्र्य

सैनिकांना स्मरण करण्यासाठी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या सूचनेनुसार माजी मंत्री सहकार महर्षी दिलीपराव देशमुख, माजी मंत्री आमदार अमित देशमुख, लातूर ग्रामीणचे आमदार धीरज देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली शहरात लातूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने आजादी गौरव पदयात्रेचे आयोजन केले असून शहरातील 9 ऑगस्ट रोजी विवेकानंद चौक ते डॉ

बाबासाहेब आंबेडकर चौक येथून साळे गल्ली येथून हते नगर, सुभाष चौक येथे समारोप होईल 10 ऑगस्ट रोजी गंजगोलाई ते दयाराम रोड, खडक हनुमान, बसवेश्वर कॉलेज, 11 ऑगस्ट रोजी अंबा हनुमान एल आय सी ऑफिस, केशव नगर, इंडिया नगर, पद्मा नगर, विशाल नगर,ते बार्शी रोड, 12 ऑगस्ट रोजी संविधान चौक, स्वागत मंगल कार्यालय, दयानंद कॉलेज छत्रपती शिवाजी

महाराज चौक,13 ऑगस्ट रोजी राजस्थान शाळा, ठाकरे चौक, सुत मिल रोड, सीताराम रोड, औसा रोड, राजीव गांधी चौक ,14 ऑगस्ट रोजी शाहू चौक, आझम चौक मदनी चौक, गणेश मंदिर, श्रीकृष्ण नगर, कोल्हे नगर, मं ठाळे नगर, कृषि उत्पन्न बाजार समिती येथे समारोप होईल
असे लातूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष किरण जाधव यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे माहिती दिली.

9 ऑगस्ट रोजी क्रांती दिनी शुभारंभ
आजादि गौरव पदयात्रा क्रांती दिनाच्या दिवशी 9 ऑगस्ट रोजी सकाळी 10 वाजता ही पदयात्रा विवेकानंद चौक लातूर येथून सुरू होणार आहे. शहरात सर्व भागात जाणार असुन त्या पद यात्रेचा समारोप 14 ऑगस्ट रोजी होणार आहे पक्षाचे सर्व फ्रंटल ऑर्गनायझेशन पदाधिकारी सर्व माजी नगरसेवक, शहर जिल्हा काँग्रेस पदाधिकारी, कार्यकर्ते यांच्यासह  जनतेने पदयात्रेत सामील व्हावे असे

आवाहन जिल्हाध्यक्ष किरण जाधव यांनी केले आहे.
या पदयात्रेत स्वातंत्र्याच्या पूर्व काळापासून देशाच्या जडणघडणीमध्ये काँग्रेस पक्षाचे योगदान भितीपत्रके, होर्डिंग्ज याद्वारे दर्शविला जाणार आहे. भारताच्या इतिहासात अनेक ऐतिहासिक निर्णय विविध योजना विकासाचा आराखडा माहिती तंत्रज्ञान टेक्नॉलॉजी आधी निर्णयात काँग्रेस पक्षाचा मोठा वाटा राहिलेला आहे

याबाबत सभेतून मान्यवर संबोधित करत माहिती देणार आहेत. 9 ते 14 ऑगस्ट यादरम्यान  होणाऱ्या पदयात्रेच्या नियोजनासाठी विविध समित्यांची स्थापना केली असून या कार्यक्रमाची जय्यत तयारी लातूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटी कडून समन्वय समिती गठण करण्यात आली असून या कार्यक्रमासाठी ॲड दिपक सुळ, स्मिता खानापुरे, ॲड फारुक शेख, जालिंदर बरडे, प्रविण

कांबळे,सुपर्ण जगताप,अक्षय मुरळे,इम्रान सय्यद, ॲड, देवीदास बारुळे, इसरार सगरे, सिकंदर पटेल, अभिषेक पतंगे, अकबर माडजे यांची समन्वय समिती करण्यात आली आहे

Recent Posts