महाराष्ट्र खाकी ( लातूर ) – आगामी काळात होऊ घातलेल्या जिल्हा परीषद आणि पंचायत समिती निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर पूर्वतयारी करण्याच्या संदर्भाने राज्याचे लातूर जिल्ह्याचे माजी पालकमंत्री तथा आमदार अमित विलासराव देशमुख यांच्या प्रमुख उपस्थितीत पदाधिकाऱ्यांची महत्वपूर्ण तातडीची बैठक बूधवार दि. 3 ऑगस्ट रोजी सकाळी 9 वाजता काँग्रेस भवन लातूर येथे
आयोजित करण्यात आली आहे. संबंधितांनी या बैठकीस वेळेत उपस्थित रहावे असे आवाहन जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष श्रीशैल उटगे यांनी केले आहे. काही महिन्यापूर्वी झालेल्या नगरपंचायत निवडणूकीत काँग्रेस पक्षाने लातूर जिल्हयात घवघवीत यश मिळवीले आहे. त्याच धर्तीवर जिल्हा परीषद आणि पंचायत समिती निवडणूकीतही यश मिळविण्यासाठी काँग्रेस पक्षाने पूर्वतयारी सुरू केली आहे.
या तयारीचा एक भाग म्हणून लातूर जिल्हयातील सर्व प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्त्यांची महत्वपूर्ण आणि तातडीची बैठक बूधवार दि. 3 ऑगस्ट रोजी सकाळी 9 वाजता काँग्रेस भवन लातूर येथे आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीत राज्याचे माजी वैद्यकीय शिक्षण सांस्कृतिक कार्यमंत्री व लातूर जिल्ह्याचे माजी पालकमंत्री तथा आमदार अमित देशमुख मार्गदर्शन
करणार आहेत. या बैठकीस काँग्रेस पक्षाचे जिल्हयातील प्रमुख नेते, पदाधिकारी, फ्रटल ऑर्गनायझेशनचे जिल्हाध्यक्ष, सर्व तालुका अध्यक्ष, सर्व माजी जिल्हा परीषद, पंचायत समिती सदस्य, सदरील निवडणूक लडवण्यास इच्छूक असलेले कार्यकर्ते या सर्वांनी वेळेत उपस्थित रहावे असे आवाहन जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष श्रीशैल उटगे यांनी केले आहे.