महाराष्ट्र खाकी ( लातूर / विवेक जगताप ) – राज्याच्या राजकारणात लातूर जिल्ह्यातील काही मोजकेच नेते चर्चेत आणि सक्रीय होते आहेत आणि पुढील काळात राहणार आहेत. या नेत्यामधील एक नाव म्हणजे लातूरचे माजी आमदार शिवाजीराव पाटील कव्हेकर हे आहेत. 1995 मध्ये विलासराव देशमूख यांचा पराभव करून ते विधानसभेत गेले आणि राज्यात चर्चेला आले. शिवाजीराव पाटील
कव्हेकर यांनी शेतकरी, (विद्यार्थी) शिक्षण क्षेत्रात भरीव कार्य केले आहे. जिल्ह्याच्या राजकारणात कव्हेकर यांचे मोठे वजन आहे. आता ते भारतीय जनता पार्टीत आहेत. पण लातूर भाजपा कडून कव्हेकरांना पूर्ण स्वीकारले गेले नाही असे चित्र दिसत आहे. त्याला कारणेही आहेत. राज्याच्या राजकारणात मोठी उलथा पालथ होऊन एकनाथ शिंदे मुख्यमंत्री आणि देवेंद्र फडणवीस
उपमुख्यमंत्री झाले. आणि राज्यात सर्व भाजपा पदाधिकाऱ्यांनी शुभेच्छा देण्यासाठी मोठे मोठे होर्डिंग लावले. लातूर भाजपा जिल्हाअध्यक्ष आमदार रमेशअप्पा कराड यांनी शहरात लावलेल्या बॅनरमध्ये पदाधिकारी, माजी – आजी आमदार, खासदार,यांचे फोटो होते पण माजी आमदार शिवाजीराव पाटील कव्हेकर यांचा फोटो नसणे हे लातूर भाजपा मधील गटबाजीचे लक्षण म्हणावे लागेल !
कव्हेकरांचा मुद्दामहून फोटो घेतला नाही. या प्रश्नाचे उत्तर तर जिल्हाध्यक्ष आमदार रमेशअप्पा कराड देतील ? कव्हेकर आणि कराड यांच्यात असलेल्या मतभेदमुळे हा प्रकार घडला असावा अशी चर्चा भाजपा कार्यकात्यामध्ये आणि जिल्ह्यात दिसून येत आहे ! मागील काळात कव्हेकरांच्या समर्थकांनी पक्षात कव्हेकरांना योग्य मान सन्मान मिळत
नसल्याची तक्रार वरिष्ठाकडे केली होती. तरी पण जिल्हाध्यक्षा कडून लावलेल्या बॅनर वर माजी आमदार कव्हेकरांचा फोटो घेतला नाही. ही भाजपा मधील गटबाजी पुढील काळात उफाळून येईल हे मात्र खरे आहे.