महाराष्ट्र खाकी ( निलंगा / प्रशांत साळुंके ) – शेतात दावणीला बांधलेल्या दोन बैलावर विज पडून जागीच ठार झाल्याची दुर्दैवी घटना कळताच माजी पालकमंञी तथा लोकप्रिय आ.संभाजीराव पाटील निलंगेकर यानी घटनास्थळी भेट देऊन धीर दिला त्यावेळी पिडित शेतकऱ्याला अश्रू अनावर झाले तात्काळ मदत मिळवून देण्याचे आश्वासन दिले. निलंगा तालुक्यातील ढोबळेवाडी
येथील शेतकरी गोपाळ विढोबा वाघमोडे यांच्या शेतात दावनीला बांधलेल्या दोन बैलावर दिनांक 31 रोजी दुपारी अचानक वादळी वा-यासह झालेल्या पावसात विज पडल्याने लाखो रूपये किमतीचे दोन बैल जागीच ठार झाल्याची दुर्दैवी घटना घडली होती.सदरील शेतकऱ्यावर दुखाचा डोंगर कोसळला आहे.माजी पालकमंञी तथा लोकप्रिय आ. संभाजीराव पाटील निलंगेकर यांना ही
घटना समजताच शिरूर अनंतपाळकडे एका कार्यक्रमानिमित्त जात असताना त्यानी तात्काळ ताफा वळवला आणि थेट पिडीत शेतकऱ्याच्या शेतात जाऊन संबंधित शेतकरी गोपाळ विढोबा वाघमोडे याना धीर देत तात्काळ मदत मिळवून देण्याचे अश्वासन दिले व निलंग्याचे तहसिलदार याना फोनवर संपूर्ण माहिती दिली आणि तात्काळ प्रस्ताव मागवून पिडित शेतकऱ्याला तात्काळ
आर्थिक मदत मिळाली पाहिजे असे आदेश दिले आहेत.
वादळी वा-यासह झालेल्या पावसात शेतीसह शेतकऱ्यांचे पशुधन दगावलेल्या पिडित शेतकऱ्यांच्या शेतीचे पंचनामे करून तात्काळ आर्थिक मदत द्या असे आदेश माजी पालकमंञी तथा लोकप्रिय आ.संभाजीराव पाटील निलंगेकर यानी अधिकाऱ्यांना दिले आहेत. यावेळी भारतीय जनता पार्टीचे प्रदेश सचिव अरविंद पाटील निलंगेकर, गावचे सरपंच व शासकीय कर्मचारी अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.